पोस्ट विवरण
सुने
कृषि
खीरा
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
19 Feb
Follow

काकडी पिकाचे लागवड तंत्र व ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन (Planting technique of Cucumber crop and fertilizer management through drip)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

काकडी हे भारतीय पीक असल्यामुळे, देशभर याची लागवड केली जाते. काकडी लागवड प्रामुख्याने उन्हाळी व खरीप हंगामात केली जाते. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात काकडीचे पीक घेतले जाते. काकडीचा गर थंड असल्यामुळे तसेच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने काकडीला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते व चांगला बाजारभाव मिळतो. काकडी हे आर्थिक दृष्ट्या देखील फायदेशीर पीक आहे. आज आपण याच काकडी पिकाच्या लागवड तंत्राविषयी जाणून घेणार आहोत.

काकडी पिकाच्या लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Weather for Cucumber cultivation):

  • काकडी हे उष्ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे.
  • उच्च तापमानात काकडीची लागवड चांगली होते.
  • काकडी हे पीक थंडी सहन करू शकत नाही म्हणून, काकडी लागवड उन्हाळी हवामानात करावी.

काकडी पिकाच्या लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Soil for Cucumber cultivation):

  • पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते.
  • काकडी लागवडीसाठी मातीचे पीएच 6-7 दरम्यान असावा.

काकडी लागवडीसाठी योग्य हंगाम (Suitable Season for Cucumber cultivation):

  • काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात करता येते.
  • खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून-जूलै महिन्यात व उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात करतात.
  • डोंगराळ भागात काकडीची लागवड मार्च व एप्रिल महिन्यात होते.

बियाणे:

एक एकर लागवडीसाठी हायब्रीड काकडीचे 200 ग्रॅम बियाणे लागते.

काकडीच्या जाती:

  • सलोनी (शाइन सीड्स)
  • NS 404 (नामधारी सीड्स)
  • मालिनी (सेमिनीस)
  • जिप्सी (पिरामिड)
  • क्रिश (वीएनआर)

काकडी पिकाची लागवड पद्धती (Cucumber cultivation):

  • शेतास उभी आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी.
  • शेतात चांगले कुजलेले 20 ते 30 गाड्या शेणखत प्रति एकरी टाकावे नंतर वखरणी करावी.
  • काकडी लागवड करताना बेड वर लागवड करावी.
  • शिफारसी प्रमाणे रासायनिक खताने बेड भरून घ्यावेत.
  • बेड बनवताना मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर ठरते, कारण यामुळे तणाचा बंदोबस्त होतो, तसेच मातीतील ओलावा टिकण्यास मदत होते.
  • दोन ओळींमधील अंतर हे 5 ते 6 फूट असणे आवश्यक आहे.
  • बेडच्या पृष्ठभागाची रुंदी 3 फूट ठेवून दोन बेड मधील चालण्याचा रस्ता 50 सें.मी. ठेवावा व उंची 40 सें.मी. असावी.
  • दोन रोपातील अंतर 2 फूट ठेवून त्याजागी एक किंवा दोन बिया टोकाव्यात किंवा रोप लावावे.
  • काकडी लागवड करण्याच्या पहिले संपूर्ण बेड ओले करावे.
  • लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी.
  • वेलींची जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी दोन-तीन नायलनच्या बारीक दोऱ्या करून घ्याव्या किंवा आता मार्केटमध्ये बारीक नायलॉन जाळी उपलब्ध आहे ती वापरावी.
  • काकडी लागवड झाल्यावर 25 ते 30 दिवसानंतर जर झाडाच्या खाली गवत असेल तर ते काढून टाकावे आणि झाडाला फळे लागल्यावर फळाचा संपर्क हा मातीशी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

खत व पाणी व्यवस्थापन:

  • काकडी पिकास 50 किलो नत्र 50 किलो पालाश 50 किलो स्फूरद लागवडीपूर्वी द्यावे. व लागवडीनंतर 1 महिन्याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्ता द्यावा.
  • या प्रमाणे युरिया - 23 किलो + 10:26:26 (भारत NPK) - 65 किलो + मॅग्नेशिअम सल्फेट (देहात- न्यूट्री MgSO4) - 4 किलो + दाणेदार गंधक 12 किलो + निंबोळी पेंड 100 किलो + सूक्ष्म पोषक खत 10 किलो + सेंद्रिय एंझाइम प्रति एकर नुसार बेड भरून घ्यावेत.
  • पावसाळयात 8 ते 10 दिवसाचे अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

काकडी पिकात ड्रिप द्वारे करावयाचे खत व्यवस्थापन (Fertilizer management through drip in Cucumber crop):

  • लागवडीनंतर 12:61:00 (देहात- न्यूट्री MAP) @ 4 किलो किंवा 13:40:13 (देहात न्यूट्री-NPK) @ 4 किलो अशा फॉस्फरसयुक्त खतांचा वापर 15 दिवसांनी सुरू करायचा आहे. या खतांमध्ये 2 दिवसांचा कालावधी ठेवायचा. या खतांसाह (बायो prime चे Fortisea) सारखे टॉनिक देखील द्यायचे आहे ज्यामुळे फुटव्यांच्या योग्य वाढीस मदत होईल.
  • सेटिंग कालावधीत 00:52:34 (देहात- न्यूट्री MKP) @ 3 किलो + 13:0:45 (देहात- न्यूट्री KNO3) @ 4 किलो किंवा
  • 13:40:13 (देहात- न्यूट्री NPK) @ 4 किलो + 0:0:50 (देहात- न्यूट्री SOP) @ 3 किलो अशी पोटॅश व फॉस्फरस युक्त खते द्यावीत.
  • सोबतच 8-10 दिवस आड कॅल्शिअम व बोरॉन युक्त खते ड्रीप द्वारे द्यावीत यामुळे फर्टीगेशन योग्य रित्या होते.
  • काकडीच्या साईज साठी वापरायची खते 13:0:45 (देहात- न्यूट्री KNO3) @5 किलो एकर सोबत कॅल्शिअम नायट्रेट (देहात- न्यूट्री CaNO3) @5 किलो प्रति एकर सोबतच चिलटेड बोरॉन 500 ग्रॅम प्रति एकर हे खत द्यावे तसेच यासोबत आपण कॅल्शियम व बोरॉन सोडू शकतो.

काकडी पिकात आढळून येणारे कीटक व रोग (Pests and diseases found in Cucumber crops):

  • मावा
  • पांढरी माशी
  • तुडतुडे
  • पाने खाणारी अळी व फळातील अळी (फळ माशी)
  • डाउनी मिल्ड्यू (केवडा)
  • पावडरी मिल्ड्यू (भुरी)
  • फळ कुज
  • मोझॅक व्हायरस

काढणी व उत्पादन:

  • काकडी पिकाची काढणी करताना फळे थोडी कोवळी असल्यास तोडावीत यामुळे बाजारामध्ये काकडीला चांगला भाव मिळतो.
  • काकडी पिकांची तोडणी ही 2 ते 3 दिवसामध्ये करणे आवश्यक आहे.
  • काकडीचे उत्पादन हे जाती व हंगामानुसार प्रति एकरी 100 ते 120 क्विंटल पर्यंत होऊ शकेल.

अशाप्रकारे काकडी लागवडीसाठी योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास व योग्य खत व्यवस्थापन केल्यास काकडीतून अधिक उत्पादन मिळविता येऊ शकते. तुम्ही तुमच्या काकडी पिकाचे व्यवस्थापन कसे करता? ड्रीपद्वारे कोणती खते देता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. काकडी लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

काकडी लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन योग्य असते.

2. काकडी लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?

काकडी लागवडीसाठी उष्ण आणि कोरडे हवामान योग्य असते.

3. काकडी लागवडीसाठी जमिनीचा सामू किती असावा?

काकडी लागवडीसाठी जमिनीचा सामू जमिनीचा सामू 6 ते 7 दरम्यान असावा.

37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ