पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
18 May
Follow

कुसुम सोलर पंप योजना 2024, महाराष्ट्र (PM Kusum Solar Pump Scheme 2024, Maharashtra)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्रात कुसुम योजना सुरु करण्यामागचे उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देणे हे असून, कुसुम योजना वित्तमंत्री अरुण जेटली जी यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. शेतकऱ्यांचा खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे. पीएम कुसुम योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसवणार आहे. त्यामुळे शेतकरी मोफत वीज निर्मिती करून त्याचा लाभ घेऊ शकणार आहे. म्हणूनच आजच्या या भागात आपण या महत्वाच्या अशा कुसुम सोलर पंप योजना 2024 विषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Scheme) तीन भागांमध्ये विभागली आहे. जाणून घेऊया ते कोणते?

  • पहिला घटक ‘अ’ मध्ये, ज्यांची जमीन नापीक आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या शेतात सोलर पंप बसवून ते याचा फायदा घेऊ शकतील. यामध्ये 5000 किलोवॅटपासून ते 2 मेगावॅटपर्यंतचे सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहेत.
  • दुसरा घटक 'ब' मध्ये, सौर पंप बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या फक्त 10% रुपये खर्च करावे लागतील. कारण खर्चानुसार 60% अनुदान सरकार देईल आणि 30% पर्यंत कर्ज दिले जाईल. हा सोलर पंप 25 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी बसवला जाईल.
  • तिसरा घटक 'क' मध्ये, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पंप आहेत ते त्यांचे सौरीकरण करू शकतात. अनेक गावांमध्ये २४ तास वीज उपलब्ध नसते. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सोलर प्लांट बसवून 24 तास वीज वापरू शकतो. शेतात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि जे डिझेल वापरतात त्यांचा डिझेलचा खर्चही वाचेल.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत (PM Kusum Solar Pump Scheme) महाराष्ट्राला अनुदान किती?

  • कुसुम योजना महाराष्ट्रचा एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
  • सरकार शेतकर्‍यांना 60% अनुदान देईल
  • 30% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ 10% रक्कम द्याव्या लागतील.
  • या योजनेअंतर्गत सौर पॅनेल मधून तयार होणारी वीज शेतकरी विकू शकतो.
  • वीज विक्री करून मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय/धंदा सुरु करू शकतो.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Scheme) 2024 चे मुख्य उद्दिष्ट :

  • पंतप्रधान कुसुम योजनेचा मुख्य उद्देश भारतातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प बसवून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यातून वीज निर्मिती करणे हा आहे. यामुळे डिझेलवर चालणाऱ्या सर्व पंपांचा वापर थांबेल आणि पर्यावरण प्रदूषणही कमी होईल.
  • पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के कर्ज दिले जाते. या अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या केवळ 10% खर्च करावा लागणार आहे.
  • या योजनेच्या मदतीने केंद्र सरकारला सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करायची आहे. जेणेकरून विजेच्या टंचाईवर मात करता येईल.
  • प्रत्येक गावात वीज पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेचे (PM Kusum Solar Pump Scheme) लाभ:

  • भारतातील सर्व शेतकरी कुसुम योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • अनुदानित किमतीत सौर सिंचन पंप उपलब्ध करून दिले जातात.
  • 10 लाख ग्रिड जोडलेल्या कृषी पंपांचे सौरीकरण या योजनेअंतर्गत केले जात आहे.
  • या योजनेतून मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती होणार आहे.
  • या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 60% आर्थिक मदत दिली जाईल आणि बँक 30% कर्ज सहाय्य देईल आणि फक्त शेतकऱ्याला 10% रक्कम भरावी लागेल.
  • ज्या शेतकऱ्यांमध्ये राज्यात दुष्काळ आहे आणि जिथे विजेची समस्या आहे, अशा शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना फायदेशीर ठरणार आहे.
  • सोलर प्लांट बसवल्यास 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सहज सिंचन करू शकतात.
  • सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी अतिरिक्त वीज, शेतकरी सरकारी किंवा निमसरकारी वीज विभागांना विकू शकतो, तेथून शेतकऱ्याला 1 महिन्यासाठी 6000 रुपयांची मदत मिळू शकते.
  • कुसुम योजनेंतर्गत जे काही सोलर पॅनल बसवले जातील, ते ओसाड जमिनीत बसवले जातील, त्यामुळे नापीक जमिनीचाही उपयोग होईल, तसेच नापीक जमिनीतून उत्पन्नही मिळेल.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Scheme) 2024 चे फायदे:

  • पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना सोलर प्लांट दिले जाणार आहेत.
  • या योजनेमुळे भारतातील सर्व शेतकरी सोलर पंपाच्या साहाय्याने आपल्या शेतात सहज सिंचन करू शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • त्यामुळे शेतकरी सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करून उत्पन्नही वाढवू शकतात.
  • सौरऊर्जेच्या वापरामुळे डिझेलचा खर्च आणि प्रदूषण कमी होईल.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Scheme) 2024 साठी पात्रता:

पंतप्रधान कुसुम योजनेसाठी अर्जदार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Scheme) 2024 साठी कागदपत्रे:

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे किसान कार्ड असणे आवश्यक आहे.
  • पत्त्याचा पुरावा
  • अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Scheme) 2024 साठी अर्ज प्रक्रिया -

  • सर्व प्रथम अर्जदाराला पंतप्रधान कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर त्याचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
  • या होम पेजवर तुम्हाला पीएम कुसुम योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर एक नवीन पेज उघडेल, यामध्ये तुम्हाला Make New Application या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर दुसरे नवीन पेज उघडेल.
  • मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरिफाय करा. यानंतर शेतकऱ्याची सर्वसाधारण माहिती टाकावी लागेल. यानंतर तुम्हाला Next बटणावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, माहिती पुन्हा भरावी लागेल, येथे तुम्हाला शेतकऱ्याचे आधार ई-केवायसी, बँक खात्याशी संबंधित माहिती, जात स्वघोषणा, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि सौर पंपाची माहिती द्यावी लागेल.
  • यानंतर अर्जदाराला सेल्फ डिक्लेरेशनसाठी दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल. नंतर तुम्ही ऑनलाइन पेमेंट कराल. एकदा पैसे भरल्यानंतर, तुम्हाला अर्ज क्रमांक प्राप्त होईल आणि एसएमएसद्वारे देखील माहिती मिळेल. यानंतर, तुमची सर्व माहिती प्रिंट करा आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

हे सगळ झालं अर्ज करण्याबाबत किंवा अर्ज करते वेळीस लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींविषयी. आता जाणून घेऊया, पंतप्रधान कुसुम सोलर पंप (PM Kusum Solar Pump Scheme) योजनेच्या अर्जाची यादी कशाप्रकारे तपासायची?

तर मित्रहो,

  • कुसुम योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निवडलेल्या अर्जदारांची नावे पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सौर योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर “ KUSUM नोंदणीकृत अर्जांची यादी ” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच निवडक अर्जदारांची यादी तुमच्या समोर उघडेल आणि आता तुम्ही या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव सहजपणे शोधू शकता.

अधिक माहितीसाठी आपण पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेच्या (PM Kusum Solar Pump Scheme) हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता जो खालीलप्रमाणे आहे.

संपर्क क्रमांक- 011-243600707, 011-24360404

टोल-फ्री क्रमांक- 18001803333

नोट: कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा.

तुम्ही कुसुम सोलर पंप योजना 202४ चा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पंतप्रधान कुसुम योजना कोणाद्वारे सुरु करण्यात आली?

पंतप्रधान कुसुम योजना वित्तमंत्री अरुण जेटली जी यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे.

2. पंतप्रधान कुसुम सोलर योजना 2024 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

पंतप्रधान कुसुम योजनेचा मुख्य उद्देश भारतातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प बसवून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यातून वीज निर्मिती करणे हा आहे. यामुळे डिझेलवर चालणाऱ्या सर्व पंपांचा वापर थांबेल आणि पर्यावरण प्रदूषणही कमी होईल.

3. पंतप्रधान कुसुम सोलर योजना 2024 अंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाईल?

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 60% आर्थिक मदत दिली जाईल आणि बँक 30% कर्ज सहाय्य देईल आणि फक्त शेतकऱ्याला 10% रक्कम भरावी लागेल.

55 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ