पोस्ट विवरण
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजना, महाराष्ट्र (PM Surya Ghar-mofat vij yojana, Maharashtra)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना ही एक सरकारी योजना आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली. तिचा उद्देश देशातील घरांना मोफत वीज पुरवणे हा आहे. ही योजना 15 फेब्रुवारी 2024 ला सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत कुटुंबांना आपल्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येणार आहेत. सबसिडी सौर पॅनलच्या लागलेल्या खर्चावर 40 टक्क्यांपर्यंत दिली जाईल या योजनेचा देशातील एक कोटी कुटुंबीयांना लाभ होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे सरकारची मोठी बचत होणार आहे. या योजनेसाठी प्रति वर्ष 75 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धती व अर्ज कोण करू शकतं अशा अनेक महत्वाच्या बाबींविषयीची माहिती.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजना म्हणजे काय (What is PM Surya Ghar-mofat vij yojana)?
- देशातील कोट्यावधी लोकांना विजेच्या बिलाने हैराण करून सोडलेले आहे. त्यामुळे पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून लोक आपली वीज बचत करू शकतात.
- या योजनेच्या माध्यमातून देशभरात केंद्र सरकारने 75 हजार कोटी रुपयांचा निधी निश्चित केला आहे.
- या योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर सौर पॅनल लावण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे.
- या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू ही झाली आहे.
- ग्रामीण भागात पोस्टमास्टरद्वारे या अंतर्गत गावातील पक्क्या घराचे सर्वे करून या घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेची वैशिट्ये काय आहेत?
- या योजनेमुळे घरगुती बिलामध्ये मोठी बचत होणार आहे.
- या योजने अंतर्गत 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40% अनुदान मिळणार आहे.
- 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंत 20% अनुदान मिळणार आहे.
- तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत आणि प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट पर्यंत मर्यादा आहे.
- तसेच जी शिल्लक राहिलेली वीज आहे ती महावितरण कंपनी प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेचे फायदे:
- प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा फायदा देशातील एक कोटी नागरिकांना होणार आहे. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल यावर भर दिला गेला आहे. या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत:
- एक कोटी नागरिकांना मोफत वीज मिळेल.
- या योजनेमुळे सरकारच्या वीज खर्चात 50 लाख रुपयांची बचत होणार आहे.
- या योजनेमुळे सौर ऊर्जेचा जास्त वापर होणार असून त्यामुळे नैसर्गिक साधनांची बचत होणार आहे.
- या योजनेमुळे प्रदूषण कमी होणार आहे. कारण कोळशामुळे तयार होणारी वीज ही कमी होईल.
- नागरिकांच्या घरातील विजेला खंड पडणार नाही, या योजनेअंतर्गत 40% पर्यंत सबसिडी मिळणार आहे.
- केंद्र सरकारच्या अंतरीम अर्थसंकल्पात सौर ऊर्जा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे.
- देशातील तब्बल एक कोटी घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार असून 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली असून यासाठी 75021 कोटी रुपये खर्च येणार आहे.
- या योजनेअंतर्गत एक कोटी घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे आणि एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याच्या या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लांट साठी 30000 रुपये तर दोन किलो वॅट क्षमतेच्या प्लॉटसाठी 60000 रुपये अनुदान देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. तसेच जे लोक आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसतील त्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी 78 हजार रुपयापर्यंत अनुदान आणि 300 युनिट मोफत विजेचा लाभ मिळणार आहे.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेचे लाभ:
- घरासाठी मोफत वीज मिळेल.
- सरकारसाठी विजेची मागणी कमी होईल.
- नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढेल.
- कार्बन उत्सर्जन कमी होईल.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेसाठीची पात्रता :
- या योजनेस पात्र होण्यासाठी सर्व प्रथम अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसला पाहिजे.
- अर्जदाराचे बँकेचे खाते त्याच्या आधार कार्ड सोबत जोडलेले असावे.
- सर्व जातीमधील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदाराकडे त्याच्या नावाचे वीज बिल असणे आवश्यक आहे.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- वीज बिल
- रेशनकार्ड
- आय प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक (बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे)
प्रधानमंत्री सूर्य घर-मोफत वीज योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे:
- प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी खालील प्रकारे रजिस्ट्रेशन करावे लागते.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा, तिथे तुम्हाला apply solar हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- त्यामधील registration here या पर्यायावर क्लिक करा.
- त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा निवडावा लागेल.
- त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक तेथे टाका.
- यापुढे next या बटनावर क्लिक करा.
- नेक्स्ट बटन वर क्लिक केल्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मग तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाका.
- त्यानंतर तुम्हाला एक कॅपच्या दिसेल तो कॅपच्या टाका नंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
- अशा पद्धतीने तुमची नवीन नोंदणी होईल.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तो खालील पद्धतीने भरा.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल, तेथे गेल्यावर Login Here हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि संकेतांक टाका.
- यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर नवीन होमपेज उघडेल.
- त्यामध्ये Apply for Rooftop Solar Installation हा फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
- त्या फॉर्ममध्ये एप्लीकेशन डिटेल्स म्हणजे त्या मध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तिथे upload करावे लागतील.
- त्यानंतर तुम्ही संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा चेक करून फायनल सबमिट करावा यानंतर तुमचा फॉर्म तपासणीसाठी जाईल आणि त्यानंतर तुम्हाला मंजुरी मिळेल आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेची स्थिति कशी चेक करावी?
- या योजनेअंतर्गत अर्ज केल्यावर त्याचे स्टेटस चेक करायचे असेल तर त्याबद्दल माहिती खाली दिली आहे.
- सर्वप्रथम फॉर्म भरल्यानंतर त्यांचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर Login Here ह्या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा, आता तुम्ही भरलेल्या फॉर्मची स्थिती चेक करण्यासाठी ट्रॅक डिटेल्स हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला तुमच्या फॉर्मची स्थिती दिसून येईल.
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजना कॅल्क्युलेटर:
- पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेसाठीकिती खर्च होईल. हे पाहण्यासाठी पीएम सूर्य घर योजना कॅल्क्युलेटर तयार करण्यात आले आहे. यामुळे तुम्हाला एक साधारणपणे किती खर्च येईल ती माहिती मिळते, हे कॅल्क्युलेटर कसे वापरावे ते पाहूया.
- पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेचे कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- तेथे Know More About Rooftop Solar या पर्यायाच्या खाली कॅल्क्युलेटर हा पर्याय आहे त्या पर्यायावर क्लिक करा.
- तिथे जी माहिती विचारली जाईल ती भरा आणि कॅल्क्युलेट या बटन वर क्लिक करा, तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये जेवढी अचूक माहिती भराल तेवढे अचूक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील, अशा पद्धतीने तुम्ही या कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता.
तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेसाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
www.pmsuryaghar.gov.in ही पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेसाठीची अधिकृत वेबसाईट आहे.
2. पीएम सूर्य घर-मोफत वीज योजना म्हणजे काय?
ही एक सरकारी योजना असून तिचा उद्देश देशातील घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे.
3. पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेचा लाभ किती लोकांना मिळणार आहे ?
पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेचा लाभ हा देशातील जवळपास 1 कोटी कुटुंबांना मिळणार आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ