पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
21 Sep
Follow

पीएम विश्वकर्मा योजना, महाराष्ट्र (PM Vishwakarma Scheme, Maharashtra : Application Process, Required Documents, Eligibility, objectives)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

पीएम विश्वकर्मा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा दिवसाचा मुहर्त साधून सुरु केलेली एक नवीन योजना आहे. देशातील कारागीरांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणी त्यांना आर्थिक मदत करून त्यांची कला वाढवावी आणी प्रगती करावी हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य हेतू आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत खासकरून देशातील छोटे कारागीर सुतार, कुंभार, लोहार हे आर्थिक वर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी पीएम विश्वकर्मा ही योजना एक वरदान ठरणार आहे. जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेणार असाल आणि योजनेची माहिती जाणून घेऊ इच्छित असाल तर आजचा आपला लेख पूर्ण वाचा.

पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्देश्य (Objectives of PM Vishwakarma Yojana):

  • भारत देशातील विविध प्रकरच्या जाती जमती सरकारकडून राबवलेल्या योजनेपासून वंचित राहत आहेत, त्यांना कामासाठी योग्य असे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देश हाच आहे की सर्व जातीच्या लोकांना योग्य प्रशिक्षण देणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायला कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे.
  • या योजनेचे मुख्य कारण असे की, या जातीतील लोकांकडे व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नसतात, परंतु हे जर पक्के कुशल कारागीर असतील तर त्यांना या योजेने अंतर्गत आर्थिक मदत केली जाते. यामुळे ते लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देऊ शकतात.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या पारंपारिक उद्योगांचा समावेश केला जाईल (Which traditional industries will be covered in the first phase of PM Vishwakarma Yojana):

  • सुतार
  • होडी बांधणी कारागीर
  • चिलखत बनवणारे
  • लोहार
  • हातोडी आणि अवजार संच बनवणारे
  • कुलूप बनवणारे
  • सोनार
  • कुंभार
  • शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे)
  • चर्मकार (पादत्राणे कारागीर)
  • मेस्त्री
  • टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर
  • बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे
  • न्हावी (केश कर्तनकार)
  • फुलांचे हार बनवणारे कारागीर
  • परीट (धोबी)
  • शिंपी आणि
  • मासेमारचे जाळे विणणारे

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्रता (Eligibility to get benefit of PM Vishwakarma Yojana):

  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत निवडलेल्या पारंपरिक उद्योगातील 18 क्षेत्रांपैकी एकामधील असावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents required to avail PM Vishwakarma Yojana):

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुक
  • वैध मोबाईल नंबर

पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (PM Vishwakarma Yojana Online Application Process):

  • ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:
  • सर्वात आधी तुम्हाला PMVIshwakarma.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करा असे चिन्ह दिसेल त्यावर क्लीक करा.
  • त्यानंतर तुम्ही आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून सीएससी पोर्टलवर login करा.
  • सगळ्यात आधी तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून अकाऊंट व्हेरिफाईड करा आणी समोर दिलेल्या माहितीनुसार फॉर्म भरा.
  • काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावी लागतील.
  • मग तुम्हाला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र डाउनलोड करा हा पर्याय दिसेल ते डाउनलोड करून घ्या.
  • या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला डिजिटल एक आयडी येईल, तो तुम्हाला पुढे कामी येईल.
  • यानंतर login करून आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा.
  • आता मुख्य अर्ज खुला होईल, त्यामध्ये सर्व माहिती अचूक भरून या योजनेसाठी आपण अर्ज करू शकता.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य हेतू काय आहे?

देशातील कारागीरांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणी त्यांना आर्थिक मदत करून त्यांची कला वाढवावी आणी प्रगती करावी हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य हेतू आहे.

2. पीएम विश्वकर्मा योजना कधी सुरु करण्यात आली?

पीएम विश्वकर्मा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा दिवसाचा मुहर्त साधून सुरु करण्यात आली.

3. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्जदारांचे वय काय असावे?

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.

26 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ