पोस्ट विवरण
सुने
पशुपालन ज्ञान
पशुसंवर्धन
DeHaat Channel
25 Mar
Follow

विषारी वनस्पती जनावरांसाठी घातक (Poisonous plants are dangerous to Animals)

विषारी वनस्पती जनावरांसाठी घातक (Poisonous plants are dangerous to Animals)

तीव्र वासामुळे तसेच चवीला रुचकर नसल्यामुळे जनावरे शक्यतो विषारी वनस्पती खात नाहीत. परंतु बऱ्याचदा दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची कमतरता असल्यामुळे जनावरे या हिरव्या वनस्पतींकडे आकर्षित होऊन नाइलाजास्तव खातात. परिणामी, अशा विषारी वनस्पती खाल्याने जनावरांना विषबाधा होते.

विषबाधा होण्यासाठी कारणीभूत वनस्पती:

कण्हेर : अ) लाल कण्हेर ब) पिवळी कण्हेर, घाणेरी, रुई किंवा रुचकी, घाणेरी, रानमोहरी, धोत्रा, बेशरम

या वनस्पती खाल्ल्यास करावयाचे प्रथमोपचार:

  • सर्वप्रथम पशुवैद्यकास संपर्क करून विषबाधा झालेल्या जनावरावर त्वरित उपचार करावेत.
  • जनावराने कोणती वनस्पती खाल्ली आहे याचा अंदाज असेल तर लगेच त्या नमुन्याची तपासणी पशुवैद्यकाद्वारे करून घ्यावी.
  • जनावरास श्‍वसनाचा त्रास होत असेल तर त्याला हवेशीर जागेत ठेवावे.
  • त्वचा प्रकाशास संवेदनशील झाली असेल तर अशा जनावरास सावलीमध्ये बांधावे.
  • जनावरास अ‍ॅक्टिवेटेड चारकोल तोंडावाटे द्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटकांचे शोषण कमी होईल.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

  • विषारी वनस्पती असलेल्या ठिकाणी जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.
  • चारा कापताना किंवा कुट्टी करून देताना त्यात विषारी वनस्पती येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • गोठ्यात नियमित फिरून पाहणी करावी. त्यामुळे जनावराच्या वागणुकीत झालेला बदल, विषबाधेशी निगडीत लक्षणे लगेच लक्षात येतात.

52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ