पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
आलू
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
9 June
Follow

बटाटा पिकातील तण व्यवस्थापन (Potato - Weed Management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत!

कंदवर्गीय पिकामध्ये बटाटा हे महत्वाचे कंद वर्गीय पीक आहे. बटाटा पिकाची लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्याची लागवड (बटाटा लागवड हंगाम) खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात करतात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करतात. मात्र खरीप हंगामात शेतात वाढणाऱ्या निरनिराळ्या तणांमुळे पिकानां अन्नद्रवे आणि पाण्याची कमतरता भासते. तसेच तणांची पिकांबरोबर हवा, जागा व सूर्यप्रकाश इत्यादी बाबतीत स्पर्धा होते परिणामी उत्पादनामध्ये घट येते म्हणूनच योग्य वेळी योग्य पद्धतीने तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण बटाटा पिकातील तण व्यवस्थापनाविषयी (Weed Management in Potato) जाणून घेणार आहोत.

तणनाशक म्हणजे काय?

तणनाशक म्हणजे उपयोग नसणाऱ्या वनस्पती नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाणारे एक रसायन. जे पिकाची मोठ्या प्रमाणात होणारी हानी रोखते व तणांचा प्रादुर्भाव नियंत्रित करते.

महाराष्ट्रात बटाटा पिकांमध्ये आढळणाऱ्या काही सामान्य तणांमध्ये जंगली राजगिरा, पित्तपापड, कामिनी घोळू, रान करडई, रान वाटाणा, बनसोया तसेच इत्यादी अनेक तणांचा समावेश आढळून येतो. हे तण पोषक, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी बटाट्याशी स्पर्धा करू शकतात, ज्यामुळे बटाटा पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. तणांच्या प्रादुर्भावामुळे बटाटा पिकाच्या उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे बटाटा पिकांचे तणांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी तण व्यवस्थापन पद्धती राबविणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया तण नियंत्रण पद्धतींविषयी.

बटाटा पिकात खरीप हंगामात आढळून येणारी तणे:

बटाटा पिकात खरीप हंगामात जंगली राजगिरा, पित्तपापड, कामिनी घोळू, ताम्हण, मोथा आणि इत्यादी अनेक तणांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

बटाटा पिकात रब्बी हंगामात आढळून येणारी तणे:

बटाटा पिकात रब्बी हंगामात रान करडई, रान वाटाणा, बनसोया, अकारी, चाकवत, चांदवेल ही तणे आढळून येतात.

एकात्मिक तणनियंत्रण पद्धती:

बटाटा पिकात तणनियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures):

  • बटाटा पिकाची इतर पिकांबरोबर आवर्तन पद्धतीने लागवड केल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. कारण वेगवेगळ्या पिकांमध्ये तणांच्या प्रजाती वेगवेगळ्या असतात आणि इतर पिकांबरोबर आवर्तनात बटाटा पीक घेतल्यास तणचक्र तोडण्यास मदत होते.
  • पिकाची वेळेवर पेरणी करणे आवश्यक आहे जेणेकरून पीक लवकर स्थिर होईल आणि तणांना सावली मिळेल. उशीरा पेरणी केल्यास पिकांची वाढ कमी होऊन तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • पेरणी अगोदर शेतात नांगरणी करून तणांची वाढ काढून टाकावी.
  • पीकतणमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छ बियाणे वापरणे गरजेचे आहे.
  • बटाट्याचे पीक शेंगदाण्यासारख्या इतर पिकांबरोबर आंतरपीक म्हणून घेतल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. कारण शेंगदाणे जमिनीत नायट्रोजन स्थिर करतात, ज्यामुळे बटाटा पिकाची वाढ सुधारण्यास आणि तणांची वाढ कमी होण्यास मदत होते.
  • भुसा किंवा गवत यांसारख्या सेंद्रिय पदार्थांनी पिकाला मल्चिंग केल्यास तणांची वाढ कमी होण्यास मदत होते.
  • या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास बटाटा पिकातील तणांचा प्रादुर्भाव रोखून चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते.

तण व्यवस्थापन तंत्र:

  • खुरप्याच्या साहाय्याने वेळोवेळी तण काढणे ही पिकातील तण नियंत्रणाची सर्वात पारंपारिक आणि प्रभावी पद्धत आहे.
  • पेरणीनंतर 30 दिवसांच्या आत किंवा ठराविक अंतराने शेतातील तण काढणे आवश्यक आहे.

बटाटा पिकामध्ये तण नियंत्रण पद्धती:

  • बटाटा पिकातील तण व्यवस्थापनासाठी पहिले ६० दिवस अत्यंत महत्वाचे असतात.
  • तण मुक्त पीक उत्पादन, पिकाची फेरपालट आणि उन्हाळ्यात लागवड करणे या योग्य कृषी पद्धतींमुळे पिकाची चांगली वाढ होते व अनावश्यक तणांचे नियंत्रण होते.
  • आच्छादन पद्धतीने वार्षिक तणांचे नियंत्रण करता येते. यासाठी लागवडींनंतर ताबडतोब भाताच्या पेंढ्याने जमीन झाकावी. आच्छादनासाठी प्लास्टिक कागदाचा किंवा पट्ट्यांचा देखील वापर करता येतो.
  • हाताने तण उपटून काढणे, खुरपे, कुदळ, फावडे यांनी तण खणून काढणे या पद्धतींचा तण नियंत्रण पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
  • रोटरी विडर सारखी उपकरणे, ट्रॅक्टर व बैल चलित फणणी तसेच ट्रॅक्टर संबंधित इतर यंत्रांनी देखील प्रभावीपणे तण नियंत्रण होऊ शकते.
  • अधिक चांगल्या प्रकारे तण नियंत्रणासाठी ट्रॅक्टर चलित नऊ स्प्रिंग फण दातळे असलेल्या फणणीचा वापर करावा.
  • पेंडिमेथालिन 38.7% सी. एस (युपीएल - दोस्त) किंवा (देहात - Pendex Plus) 700 मिली प्रति एकर या प्रमाणात पेरणीनंतर 48 तासाच्या आत फवारावे.
  • लागवडीनंतर ३ ते ५ दिवसांत मेट्रिबुझीन 70% डब्लूपीची (टाटा रैलिस-टाटा मेट्री) 140 ग्रॅम ची एकरी 200-300 ली पाण्यातून फवारणी करावी किंवा
  • ऑक्सिफ्लोरफेन 23.5 % ईसी (युपीएल-अमिगो) 160 ते 200 मिली एकरी 200 - 300 ली पाण्यातून फवारावे.

तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी:

  • तणनाशकाच्या डब्यावरील लेबल नीट वाचून घ्यावे.
  • शिफारशीत मात्रेनुसार व वेळेनुसार फवारावे.
  • ढगाळ व पावसाळी वातावरण, धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये.
  • वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी.
  • कडक उन्हात उगवणपश्‍चात तणनाशकाची फवारणी टाळावी.
  • उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी.
  • तणनाशकांचा शिफारशीत मात्रेतच वापर करावा.
  • वारंवार एकच तणनाशक न वापरता आलटून पालटून वापर करावा. एकदा पेरणीपूर्व तर दुसऱ्यावेळी शिफारशीप्रमाणे उगवणपश्‍चात तणनाशक वापरावे.
  • फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो.
  • सेंद्रिय खताचा एकरी 4 ते 6 टन वापर केल्यास जमिनीतील तणनाशकाचे अंश धरून ठेवले जातात तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुध्दा वाढते.
  • खोल नांगरट केल्यास जमिनीच्या थरांची उलथापालथ होऊन वरचा जास्त अंश असलेला थर अशा मशागतीमुळे खोल जातो.
  • त्यामुळे तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही.

तणनाशकामुळे होणारे फायदे:

  • पीक उत्पादन वाढते.
  • तणनाशके मॅन्युअल खुरपणी किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा अधिक किफायतशीर ठरतात, विशेषत: मोठ्या शेतात.
  • हाताने तण काढणे किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींच्या तुलनेत तणनाशकांचा वापर केल्यास वेळ वाचतो.
  • तणनाशके मशागतीची गरज कमी करतात, ज्यामुळे मातीची धूप रोखता येते आणि मातीचे आरोग्य सुधारते. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या यंत्र सामग्रीची गरज कमी करून ते हरितगृह वायूचे उत्सर्जनही करतात.
  • तणनाशके शेतातील मजुरीचा खर्च कमी करू शकतात.

तणनाशकांमुळे होणारे तोटे:

  • काही तणनाशके नॉन-बायोडिग्रेडेबल असतात आणि दीर्घ काळासाठी हानिकारक असतात.
  • तणनाशके किंचित विषारी आहेत. त्यामुळे ती विविध आजारांना कारणीभूत ठरू शकतात. काही डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्या आणि वापरकर्त्यांच्या श्वासोच्छवासावर देखील परिणाम करू शकतात आणि तण नाशकाच्या अयोग्य वापरामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
  • वाहत्या पावसाच्या पाण्यासह तणनाशके प्रवाहात वाहून जाऊ शकतात किंवा भूगर्भातील पाण्याच्या पुरवठ्यात मिसळून पाणी प्रदूषित करू शकतात.
  • तृणभक्षी तणनाशकांनी उपचार केलेल्या वनस्पती खाऊ शकतात ज्यामुळे वाढणाऱ्या अन्न साखळीत विषारी घटक जातील.

तुम्ही बटाटा पिकात तणांचे व्यवस्थापन कसे केले? आणि तुम्हाला त्याचा काय फायदा दिसून आला? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. बटाटा पिकाची लागवड कधी करावी?

बटाटा पिकाची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करावी.

2. तणनाशक फवारणीसाठी कोणते नोझल व पंप वापरावा?

जमिनीवर तणनाशक फवारणी करत असल्यास शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशकांच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पाठीवरचा नॅपसॅप पंप वापरावा.

3. बटाटा पिकात तणांमुळे किती टक्क्यांपर्यंत घट दिसून येते?

बटाटा पिकात विविध तणांमुळे 80 टक्क्यांपर्यंत घट दिसून येते.

4. बटाट्याचे पीक किती दिवसात येते?

बटाट्याचे पीक 90 ते 100 दिवसांत कापणीसाठी तयार होते.

32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ