पोस्ट विवरण
भुरी रोग : लक्षणे आणि व्यवस्थापन (Powdery Mildew : Symptoms and Management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
ढगाळ हवामान, कमी ते मध्यम प्रकाश, 22 ते 28 अंश सेल्सिअस इष्टतम तापमान व दमट वातावरण या बाबी अनुकूल असणाऱ्या भुरी रोगाविषयीची माहिती आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत. भुरी रोगाचा प्रादुर्भाव हा 35 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानाच्या तसेच थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या पानांच्या पृष्ठभागावर कमी होतो. दिवसांतील कोरडे वातावरण आणि कमी तापमान अशा अनुकूल परिस्थितीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. घरासमोरील तुळशीचे झाड भुरी रोग येण्याची चाहूल देते. म्हणजेच भुरीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असता सर्वप्रथम याचा प्रादुर्भाव तुळशीच्या रोपावर आढळून येतो.
भुरी रोगासाठी काही अनुकूल पिके:
काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, मिरची, गुलाब आणि दोडका इ.
भुरी रोगासाठी रोगकारक बुरशी:
जवळजवळ सर्वच वेलवर्गीय पिकांमध्ये ईरीसीफी सीकोरेसीआरम, तर कलिंगड, खरबुजामध्ये स्फिरोथीका फुलीजीना बुरशीमुळे हा रोग होतो.
भुरी रोगाची लक्षणे (Powdery Mildew Symptoms):
- रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानांपासून होते.
- भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जुन्या किंवा बुंध्याजवळील पानांवर होतो.
- भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या पानांवर, फुलकळी तसेच देठावर भुरकट रंगाचे बुरशीचे ठिपके दिसून येतात.
- कालांतराने झाडाची पाने पिवळी पडून गळून जातात. तसेच प्रकाशसंश्लेषन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.
- पानांच्या दोन्ही पृष्ठभागांवर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.
- प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि वेली वाळतात.
- हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे वेलींची वाढ खुंटते.
- रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.
भुरी रोग व्यवस्थापन (Powdery Mildew Management) :
- लागवडीसाठी भुरी रोगास सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करावी.
- पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करावे तसेच पिकांची फेरपालट करावी.
- पिकास पोटॅश अन्नद्रव्य कमी पडल्यास पीक भुरी रोगाला बळी पडते त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित प्रमाणात करून पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही.
- प्लॉट मध्ये आद्रता टिकवून ठेवण्यासाठी शक्य असल्यास तुषार सिंचनाचा वापर करावा.
- भुरी रोगाची लक्षणे दिसताच, फवारणी प्रतिलिटर पाणी
- अॅपेलोमायसेस क्विस्क्वालिस (कात्यायनी-अॅपेलोमायसेस) 1 लिटर प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा पिकात एकरी फवारणी करावी अँपेलोमायसेस क्विस्क्वालिस ची बुरशी भुरी रोगाच्या बुरशीवर उपजीविका करते त्यामुळे रोग नियंत्रणास तसेच प्रतिबंधास मदत होते. किंवा
- शेवटच्या टप्प्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर करावा. यामध्ये गंधक 80% @400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी (वेलवर्गीय पीक व उन्हाळा हंगाम वगळता), मायक्लोब्यूटानिल 10% डब्ल्यू (इंडोफील-बून) @100 ग्रॅम किंवा झिनेब 68% + हेक्साकोनॅझोल 4% डब्ल्यू (इंडोफील-अवतार) @400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी
- कीड आणि रोगांच्या विरोधी लढण्याची क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन @1 मिली प्रति लिटर तसेच कायनेटिन घटक असणारे (वेस्टकोस्ट-कीटोगार्ड) @2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फुलोरा अवस्थेपूर्वी 2 वेळा फवारणी करावी
- अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एससी (देहात-ॲझिटॉप) - 300 मिली/एकर किंवा
- अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) - 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.
- पुढील फवारणी आवश्यकतेनुसार 8-10 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.
- वरील पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल.
तुमच्या कोणत्या पिकात भुरी रोगाची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भुरी रोगासाठी अनुकूल वातावरण कोणते?
भुरी रोगासाठी ढगाळ हवामान, कमी ते मध्यम प्रकाश, २२ ते २८ अंश सेल्सिअस इष्टतम तापमान व दमट वातावरण अनुकूल असते.
2. भुरी रोगासाठी अनुकूल पिके कोणती?
भुरी रोगासाठी काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दुधी भोपळा, तांबडा भोपळा आणि दोडका इ. पिके अनुकूल आहेत.
3. भुरी रोगाचे प्राथमिक लक्षण कोणते?
पानांच्या दोन्ही पृष्ठभागांवर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते हे भुरी रोगाचे प्राथमिक लक्षण आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ