पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
पपीता
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
3 Dec
Follow

पपई पिकातील तण व्यवस्थापन

पपई पिकातील तण व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. पपईच्या रोपांची पुनर्लागण केल्यानंतर बागेतील काही कामे प्रथमदर्शनी क्षुल्लक वाटली तरी भरघोस पीक येण्याच्या दृष्टीने त्याचे फार महत्व असते. बागेत गवत आणि झाडेझुडपे म्हणजेच तण वाढल्यास ते पपईच्या झाडाशी स्पर्धा करुन जमिनीतील पोषणद्रव्ये ब-याच प्रमाणात शोषून घेतात. विशेषत : झाडे लहान असताना विस्ताराला अडथळा येऊन ती कायमची कमजोर बनतात. मुळ्यांना नीट हवा मिळू शकत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात. शिवाय गळतात. ही हानी टाळण्य़ासाठी बागेतील तण वारंवार काढून टाकले पाहिजेत.

आता जाणून घेऊया तण काढताना काय काळजी घ्यावी याविषयी:

 • झाडे लावल्यानंतर 15-2- दिवसांनी निंदणी करावी.
 • पपईच्या झाडाच्या मुळ्या जमिनीत उथळ वाढतात म्हणुन खोल आंतरमशागत कधीही करू नये.
 • आंतरमशागत हलकी व वारंवार करावी.
 • वर्षातून दोन वेळा उभी-आडवी हलकी नांगरणी व वखरणी करावी.
 • जमीन भुसभुशीत ठेवल्याने फळांची प्रत व उत्पादन सुधारते.
 • आळ्यातील गवत खुरप्याने निंदून घ्यावे.
 • पावसाळ्यात हिरवळीचे खत पीक पेरणे व तागाची पेरणी करुन फुलावर येण्याअगोदर जमिनीत गाडून टाकणे चांगले.
 • ठिबक सिंचन वापरल्यास तण वाढीचे प्रमाण कमी असते.

कोणते तणनाशक वापरावे?

 • तणनाशक वापरायचे झाल्यास झाड 1 मीटर उंच झाल्यावर सिजेंटा-ग्रामोक्झानसारखे स्पर्शजन्य तणनाशक 200 लिटर पाण्यात 1 लिटर या प्रमाणात मिसळून साधे नोझल न वापरता डब्लूएफएन 78 किंवा डब्लूएफएन 562 नोझल वापरून फवारा झाडांच्या कोणत्याही भागावर उडणार नाही, अशी दक्षता घेऊन फक्त तणांवर मारा. यामुळे लव्हाळा, हरळीसारखी एकदल तणे आटोक्यात येतात.
 • तसेच पॅराक्वाँट हे तणनाशक 0.8 किलो प्रति हे. 200-280 लीटर पाण्यात मिसळून देखील फवारणी करता येते. फवारणी करताना हूडचा वापर करावा. झाडाच्या खोडावर तणनाशक पडणार नाही याची काळजी घ्यावी.
 • झाडाच्या बुंध्यातील गवत शक्यतो खुरपणी करून काढावे.

याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

 • पपईवरील महत्वाच्या रोगांच्या व्यवस्थापनाविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/eLY9bm8d9Eb हे वाचा.
 • वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्राविषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
 • त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre

66 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ