सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Dec
Follow
परभणी बाजार समितीमध्ये २३ हजार क्विंटलवर कापूस खरेदी
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत गुरुवार (ता. २८) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) तर्फे २९६ शेतकऱ्यांकडून ५ हजार ७२५ क्विंटल आणि खासगी खरेदीदारांकडून सुमारे १८ हजार क्विंटल मिळून एकूण २३ हजार ७२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. 'सीसीआय'ने कापसाला प्रतिक्विंटल किमान ७३०० ते कमाल ७४९० रुपये तर खासगी खरेदीदाराकडून प्रति क्विंटल किमान ७१४५ ते कमाल ७२३५ रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीअंतर्गत 'सीसीआय'चे कापूस खरेदी केंद्र गंगाखेड रस्त्यावरील सिंगणापूर फाटा येथील जिनिंग कारखान्यामध्ये आहे. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीपूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
66 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ