सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Sep
Follow
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाच लाख ६२ हजार हेक्टरवर क्षेत्राची ई-पीकपाहणी

यंदाच्या खरीप हंगामात परभणी व हिगं गोली जिल्ह्यांत सोमवार (ता. ९) पर्यंत ४ लाख ४२ हजार ६३६ शेतकरी खातेदारांनी ५ लाख ६२ हजार ७९८ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी केली आहे. या दोन जिल्ह्यांत खरिपाचे पेरणी क्षेत्र व ई-पीकपाहणी क्षेत्र यांच्यात अद्याप मोठी तफावत दिसत आहे. खरीप हंगामातील ई-पीकपाहणीसाठी रविवार (ता. १५) मुदत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यात खरिपाची ५ लाख २७ हजार ९०१ हेक्टर पेरणी झाली आहे. सोमवार (ता. ९) पर्यंत जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ५२४ शेतकरी खातेदारांनी ३ लाख ७९ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रावरील ई-पीकपाहणी केली आहे. त्यात चालू पड क्षेत्र १ हजार ९९७ हेक्टर आहे.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
