पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Jan
Follow

परभणी, हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६८ हजार क्विंटल कापसाची खरेदी

परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शुक्रवार (ता. ३) पर्यंत सीआय आणि खासगी मिळून एकूण ७ लाख ६८ हजार ६५५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्यात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ११ केंद्रावर ५ लाख २६ हजार १७३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआयकडून हमीभावाने ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७४७१ रुपये दर देण्यात आले. खासगी व्यापाऱ्यांकडून २ लाख ५२ हजार ४२ क्विंटल कापसाची प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७००० रुपये दराने खरेदी करण्यात आली.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ