पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Oct
Follow

परभणी, हिंगोली जिल्ह्यात हमीभावाने ९२३ क्विंटल सोयाबीन खरेदी

किमान आधारभूत किंमत दराने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ४ केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. २४) ६१ शेतकऱ्यांचे ९२३.४८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. दरम्यान, या जिल्ह्यांतील १८ खरेदी केंद्रांवर ८ हजार ५४६ शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत यंदा परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रिय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्यातर्फे मंगळवारपासून (ता. १५) सोयाबीन खरेदी केली जात आहे.


23 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ