सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 June
Follow
परभणी, हिंगोलीत हरभऱ्याला ५१०० ते ६७०० रुपयांचा दर
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील हरभऱ्याची उत्पादकता घटल्याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील हरभऱ्याच्या आवकेवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हरभऱ्याची आवक कमी आहे. मागील आठवड्यात या दोन जिल्ह्यात हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान ५१०० ते ६७०० रुपये दर मिळाला. नोव्हेंबर २०२३ च्या अखेरीस या दोन जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसला. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. परंतु त्यानंतर हरभरा पिकांसाठी आवश्यक थंडी नव्हती. त्यामुळे उत्पादकता घटली. हरभऱ्याचे पीक मोडून इतर पिके घेतल्यामुळे क्षेत्र देखील कमी झाले. त्यामुळे हरभऱ्याची बाजारपेठेतील आवक कमी आहे.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ