पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
10 Feb
Follow

प्रधानमंत्री कुसुम योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून शेतकरी हा देशाचा कणा आहे. ते बळकट करण्यासाठी वीज दर सवलतीसह इतर सुविधा व सवलती, विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सबसिडी दिली जाते. महाराष्ट्रात कुसुम योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देणे हे असून, कुसुम योजना वित्तमंत्री अरुण जेटली जी यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपाचे सौर ऊर्जा पंपांमध्ये रूपांतर करणार आहे. यामुळे देशातील शेतकरी जे डिझेल किंवा पेट्रोलच्या सह्याने सिंचन पंप चालवतात, ते पंप आता महाराष्ट्र कुसुम योजने अंतर्गत सौर उर्जेवर चालवले जातील. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात डिझेल आणि पेट्रोल वर चालणारे देशातील 1.75 लाख पंप आता सौर पॅनलच्या मदतीने सौरऊर्जेवर चालवले जातील.

महाऊर्जेमार्फत राज्यातील महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसूम घटक-बी योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषीपंपाकरीता महाऊर्जेच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल दिनांक 17 मे 2023 रोजीपासून सुरू करण्यात आलेला आहे.

कुसुम योजनेंतर्गत महाराष्ट्राला अनुदान किती?

  • कुसुम योजना महाराष्ट्रचा एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
  • सरकार शेतकर्‍यांना 60% अनुदान देईल
  • 30% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ 10% रक्कम द्याव्या लागतील.
  • या योजनेअंतर्गत सौर पॅनेल मधून तयार होणारी वीज शेतकरी विकू शकतो.
  • वीज विक्री करून मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय/धंदा सुरु करू शकतो.

कुसुम योजनेचे लाभ:

  • भारतातील सर्व शेतकरी कुसुम योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • अनुदानित किमतीत सौर सिंचन पंप उपलब्ध करून दिले जातात.
  • 10 लाख ग्रिड जोडलेल्या कृषी पंपांचे सौरीकरण या योजनेअंतर्गत केले जात आहे.
  • या योजनेतून मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती होणार आहे.
  • या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 60% आर्थिक मदत दिली जाईल आणि बँक 30% कर्ज सहाय्य देईल आणि फक्त शेतकऱ्याला 10% रक्कम भरावी लागेल.
  • ज्या शेतकऱ्यांमध्ये राज्यात दुष्काळ आहे आणि जिथे विजेची समस्या आहे, अशा शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना फायदेशीर ठरणार आहे.
  • सोलर प्लांट बसवल्यास 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सहज सिंचन करू शकतात.
  • सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी अतिरिक्त वीज, शेतकरी सरकारी किंवा निमसरकारी वीज विभागांना विकू शकतो, तेथून शेतकऱ्याला 1 महिन्यासाठी 6000 रुपयांची मदत मिळू शकते.
  • कुसुम योजनेंतर्गत जे काही सोलर पॅनल बसवले जातील, ते ओसाड जमिनीत बसवले जातील, त्यामुळे नापीक जमिनीचाही उपयोग होईल, तसेच नापीक जमिनीतून उत्पन्नही मिळेल.

पात्रता:

  • अर्जदार लाभार्थी हा भारत देशाचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • कुसुम योजनेअंतर्गत, अर्जदार 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज करू शकतो.
  • अर्जदार त्याच्या जमिनीच्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी/ वितरण महामंडळाने अधिसूचित केलेल्या क्षमतेसाठी जे कमी असेल त्याच्यासाठी अर्ज करू शकतो.
  • प्रति मेगावॅटसाठी सुमारे 2 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  • या योजने अंतर्गत, स्वत:च्या गुंतवणुकीसह प्रकल्पासाठी कोणत्याही आर्थिक पात्रतेची आवश्यकता असणार नाही.
  • जर अर्जदार विकासकामार्फत प्रकल्प विकसित करत असेल, तर विकासकाला प्रति मेगावॉट 1 कोटी रुपये संपत्ती असणे आवश्यक आहे.

कुसुम योजना 2023 लाभार्थी:

  • शेतकरी
  • सहकारी संस्था
  • शेतकर्‍यांचा गट
  • जल ग्राहक संघटना
  • शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • नोंदणीची प्रत
  • अधिकृतता पत्र
  • जमिनीच्या जमाबंदीची प्रत
  • चार्टर्ड अकाउंटंटने जारी केलेले नेट वर्थ प्रमाणपत्र (प्रकल्प विकासकाद्वारे विकसित झाल्यास)
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते विवरण
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • आता मुख्यपृष्ठावर, तुम्हाला कुसुम योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
  • तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची वरील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.

हे सगळ झालं अर्ज करण्याबाबत किंवा अर्ज करते वेळीस लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींविषयी. आता जाणून घेऊया, कुसुम योजनेच्या अर्जाची यादी कशाप्रकारे तपासायची?

तर मित्रहो,

  • कुसुम योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निवडलेल्या अर्जदारांची नावे पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सौर योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर “ KUSUM नोंदणीकृत अर्जांची यादी ” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच निवडक अर्जदारांची यादी तुमच्या समोर उघडेल आणि आता तुम्ही या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव सहजपणे शोधू शकता.
  • अधिक माहितीसाठी आपण कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता जो खालीलप्रमाणे आहे.

संपर्क क्रमांक: 011-243600707, 011-24360404

टोल-फ्री क्रमांक: 18001803333

तुम्ही सरकारच्या या अभियानाचा लाभ घेतला आहे का? तुमची उत्तरे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ