पोस्ट विवरण
सुने
कृषि
ईख
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
6 Nov
Follow

पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्र (Pre-Season Sugarcane Cultivation Techniques)

नमस्कार मंडळी,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारतात ऊसाला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे. ऊसाची लागवड संपूर्ण भारतात केली जाते. आपल्या राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे. भारतातील ऊस पिकाच्या 13 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील असून देशातील ऊस उत्पादनाच्या 15 टक्के उत्पादन राज्यात होते. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात सुरु हंगाम, पूर्वहंगाम तसेच आडसाली हंगाम अशा तिन्ही हंगामात ऊसाची लागवड केली जाते. आजच्या लेखात आपण याच हंगामांपैकी पूर्व हंगामातील ऊस लागवड तंत्राविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

पूर्व हंगामातील ऊसाची लागवड केव्हा केली जाते?

तर मंडळी, पूर्व हंगामातील ऊसाची लागवड 15 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान केली जाते.

पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी योग्य जमीन?

  • पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी पाण्याचा उत्तमनिचरा होणारी, 60 ते 120 सेंमी खोलीची मध्यम ते भारी जमीन असावी लागते.
  • जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचे किमान प्रमाण 0.65 टक्क्यांपेक्षा अधिक असावे.
  • पाण्याचे एकसारखे वितरण होण्यासाठी जमिनीला 0.1 ते 0.3 टक्का उतार असावा.

सुधारित जाती:

पूर्वहंगामी लागवड करण्यासाठी मध्यम पक्वतेच्या, सुधारित व अधिक ऊस आणि साखर उत्पन्न देणाऱ्या जातींची निवड करावी.

  • फुले 265
  • को 86032
  • फुले 10001
  • को 94012
  • व्हीएसआय 08005
  • तसेच कोल्हापूर विभागासाठी को 92005 या वाणाची निवड करावी.

जमिनीची निवड आणि पूर्व मशागत:

  • ऊसाचे पीक शेतात एक वर्षापेक्षा जास्त दिवस राहते, म्हणून पूर्वमशागत चांगली करणे आवश्‍यक आहे.
  • खरीप हंगामातील पीक काढणीनंतर ट्रॅक्‍टरच्या साह्याने जमिनीची उभी आडवी अशी दोन वेळा नांगरट करावी.
  • ढेकळे फोडून आवश्यकतेनुसार 1 ते 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
  • पूर्व हंगामी लागवडी पूर्वी शक्य असल्यास ताग किंवा धेंच्या या सारखी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावी.
  • हे शक्य नसल्यास 10 टन चांगले कुजलेले शेणखत आणि त्याबरोबर 100 जिप्सम प्रति एकरी जमिनीत मिसळावे.

लागवड पद्धती:

  • लागवडीसाठी बेणेमळ्यात वाढविलेले 9 ते 10 महिने वयाचे निरोगी, रसरशीत, लांब कांड्याचे आणि फुगीर डोळ्याचे शुद्ध बेणे वापरावे.
  • आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते. खात्रीशीर रोपवाटिकेतूनच रोपे घ्यावीत.
  • लागवड 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.
  • रिजरच्या साह्याने भारी जमिनीत 4.5 ते 5 फुटांवर आणि मध्यम भारी जमिनीत 4 ते 4.5 फुटांवर सऱ्या पाडाव्यात.
  • सरीची लांबी उतारानुसार 20 ते 40 मीटर ठेवावी.
  • एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून 1 फूट अंतरावर आणि दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर अर्धा फूट ठेवून डोळे बाजूला येतील अशा पद्धतीने लागवड करावी.
  • जमिनीची घनता 1.4 पेक्षा कमी आणि जमिनीतील हवेचे प्रमाण 50 टक्के असावे.
  • पाणीपातळी 1.5 ते 2 मीटरपेक्षा खोल असावी.
  • भारी जमिनीतील 1.5 ते 2 फूट खोलीवरील जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर 3 वर्षांतून एकदा 1 ते 1.5 मीटर अंतरावर उताराच्या दिशेने सब सॉयलरने नांगरट करावी.
  • ऊसाच्या रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत 150 सेंमी अंतरावर (पाच फुटांवर) उतार पाहून सऱ्या पाडाव्यात.

सेंद्रिय खतांसाठी :

  • शेणखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, प्रेसमड कंपोस्ट, पोल्ट्रीखत, लेंडीखत, पेंडी वापरणे आणि शेतात बकरी बसविणे या पर्यायातून सेंद्रिय खताचा वापर करावा.
  • सेंद्रिय घटकांमुळे सूक्ष्म जिवाणू, गांडुळे, विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीतील प्रमाण वाढल्याने ऊसाची चांगली वाढ होते. या तंत्राने जमीन सुपीक, सधन आणि जिवाणू समृद्ध होते. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
  • त्याचप्रमाणे सेंद्रिय अन्नद्रव्य पिकास उपलब्ध झाल्याने ऊस आणि कांड्यांची संख्या, लांबी, जाडी, वजन वाढल्याने उत्पादनात भरीव वाढ होते.

तुम्ही पूर्वहंगामी ऊस पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. ऊसाची लागवड महाराष्ट्रात कोणत्या हंगामात करतात?

महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत.

2. महाराष्ट्रातील सर्वात जास्त ऊस उत्पादक जिल्हे कोणते?

पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद हे प्रमुख ऊस उत्पादक जिल्हे आहेत.

3. ऊस पिकात आढळणारे प्रमुख तण कोणते?

ऊसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची गतवर्गीय तणे मोथा, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची गवतवर्गीय तणे आढळतात.

51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ