पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
बैंगन
कीट
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
17 Dec
Follow

वांगी फळात येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय (Problems in Brinjal and its solutions)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

वांगी पिकाचे उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर घेतले जाते. या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. तसेच एकदा लागवड केल्यावर त्याच पिकाचे उत्पादन एक ते दीड वर्ष घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे जास्त काळासाठी एकाच जमीनीत एकच पीक राहिल्याने वांग्याच्या फळांमध्ये सूत्रकृमी, फळे पोखरणारी अळी, मर रोग आणि फळ गळ अशा विविध समस्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. याच प्रादुर्भावापासून पिकाचे नियंत्रण करण्यासाठी आजच्या भागात आपण वांग्याच्या फळात येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपायांविषयी जाणून घेणार आहोत.

सूत्रकृमी:

सूत्रकृमीची लक्षणे (Symptoms of Nematode):

  • सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असेल तर झाडाच्या मुळांवर गाठी दिसून येतात.
  • तयार झालेल्या गाठींमुळे झाडाच्या मुळांमधून अन्नद्रव्ये आणि पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, यामुळे झाडाची पाने हळूहळू पिवळी पडून वळायला लागतात.
  • या सगळ्या समस्यांमुळे वांगी पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो.

सूत्रकृमीचे (निमॅटोड) व्यवस्थापन (Management of Nematode):

  • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलवर नांगरट करावी.
  • पिकांची फेरपालट करावी.
  • पिकामध्ये झेंडूची लागवड हा सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी उत्तम उपाय आहे.
  • मिश्र पिकांची लागवड करावी.
  • निम ऑइल 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून वर्षातून 2,3 वेळा मुळांना देऊन आळवणी करू शकता.
  • पॅसिलोमायसिस लिलियानस हे घटक असलेले (पॅसिनेमो - विजय अॅग्री इंडस्ट्री) 1 लिटर + ट्रायकोडर्मी व्हिरीडी 1 लिटर प्रमाणात 200 लिटर पाण्यात मिसळून याची आळवणी पिकाच्या मुळाजवळ करायची किंवा
  • बायर कंपनीचं वेलम प्राईम 200 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून मुळाजवळ करायची.
  • भाजीपाला पिकांमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आदाम कंपनीचं निमिट्स याची 1 ग्रॅम प्रति झाडी अशी आळवणी करायची.
  • सूत्रकृमींचा प्रादुर्भाव नसलेल्या किंवा प्रतिकारक रोपांचा वापर करावा.

फळे पोखरणारी अळी:

फळ पोखरणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms of Fruit Borer):

  • फुलांवर, फळांवर खाल्ल्याची चिन्हे दिसतात.
  • शेंगांवर आत शिरल्याची आणि बाहेर पडल्याची छिद्रे विष्ठेने बंद केलेली दिसतात.
  • फळातील गर नष्ट होऊन विष्ठेने फळ भरते.
  • पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले, फळे न धरता वळून, सुकून जमिनीवर गळून पडतात.
  • अळ्या गुलाबी रंगाच्या असुन डोके तपकिरी असते.

फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन (Management of Fruit Borer):

  • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून किडीच्या विविध अवस्था नष्ट होतील.
  • वांग्याच्या सुधारित व शिफारस वाणांचा वापर करावा.
  • पिकाला गरजेनुसार खताची मात्रा द्यावी व आवश्यकता असेल तेवढेच पाणी द्यावे.
  • प्रादुर्भावग्रस्त झाडाची फळे तोडून अळ्या सहित त्यांचा नायनाट करावा.
  • वाणांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे.
  • वांग्याच्या पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत.
  • प्रति किलो बियाण्यावर 1.5 ते 4 मिली थायमेथॉक्सम 30% एफएस (देहात - असेर एफएस) ने बीजप्रक्रिया करावी.
  • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास इमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-Illigo) 54 - 88 ग्रॅम किंवा
  • थाईमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-Entokill) 50 - 80 मिली किंवा
  • डेल्टामेथ्रिन 100% ईसी (बायर-डेसिस) 135 मिली 200 लीटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फ्लुबेन्डियामाइड 39.35% एससी (बायर-फेम) 600 मिलीची 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी.

मर रोग:

मर रोगाची लक्षणे (Symptoms of Wilt):

  • मर रोगाची बुरशी बियाण्यातून अथवा जमिनीतून मुळाद्वारे रोपात प्रवेश करते आणि खोडाच्या आतील भागात वाढते परिणामी जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांचा पानाकडे होणारा पुरवठा बंद होतो व त्यामुळे सुरवातीला या रोगात कोवळी पाने व फांद्या सुकतात आणि शेवटी पूर्ण झाड वाळून जाते.
  • या रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमीन आणि बियांद्वारे होतो.
  • प्रथम पाने पिवळसर होतात आणि सुकतात. मर रोगग्रस्त झाड शेवटी पूर्णपणे मरून जाते.

मर रोगाचे व्यवस्थापन (Management of Wilt):

  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वांग्या वरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करावी.
  • वांगी या पिकानंतर परत वांगीच न घेता ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिके घ्यावीत.
  • उन्हाळ्यामध्ये नांगरट करत असताना ती खोल करावी.
  • मर रोगाला आळा घालण्यासाठी शेतकरी वर्ग ज्या मित्र बुरशीचा वापर करत आहेत ती म्हणजे जगातील शक्तिशाली असलेली ट्रायकोडर्मा जैविक बुरशी.
  • या बुरशीच्या 90 च्या आसपास प्रजाती आढळतात.
  • सर्वप्रथम ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीच्या तंतुमध्ये विळखा घालून त्याभोवती आपले साम्राज्य वाढवते म्हणजेच तंतुमय वाढीचे आवरण तयार करते.
  • एकाच शेतात सतत वांगी पीक घेणे टाळावे.
  • मर रोगग्रस्त जमिनीत वांग्याचे पीक घेऊ नये.
  • लागवडीपूर्वी 3 ग्रॅम कार्बेन्डाझिम 50% WP (क्रिस्टल-बाविस्टीन) प्रती किलो बियाण्यास लावावे. नंतर ५ ग्रॅम माइक्रोबैक्स ट्राइकोविन (ट्राइकोडर्मा विरिडी) या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
  • मर रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.
  • रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर उपटून फेकून द्यावीत.
  • रासायनिक पद्धतीने रोग नियंत्रण करताना कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची आळवणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुमच्या वांग्याच्या फळात कोणत्या समस्या दिसून येतात आणि तुम्ही त्यावर काय उपाय केले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. वांगी पिकाची लागवड कोणत्या हंगामात करतात?

वांग्याचे पिक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात.

2. वांगी पिकाचा खोडवा घेता येतो का?

‘वांगी’ पिकाचा खोडवा वर्षभर यशस्वीरित्या घेता येतो.

3. कोणत्या पिकानंतर वांगी घेऊ नये?

बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची पिकानंतर वांगी घेऊ नये, करणा कॉलर रॉट सारखे रोग होण्याची शक्यता असते.

36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ