पोस्ट विवरण
राज्याच्या पश्चिम भागाला पावसाचा तडाखा
राज्यात शुक्रवारी (ता. १०) झालेल्या मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने फळपिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे. ठिकठिकाणी ओढे, नाले ओसंडून वाहिले. विशेषतः नाशिकसह पुणे, नगर, सातारा आणि अकोला जिल्ह्यांना तडाखा बसला. जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात सिन्नर, दिंडोरी, कळवण व चांदवड तालुक्यांत वादळी पावसाने भाजीपाला पिकांची व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैना केली. तुफान वादळी पावसाने पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव भागात भाजीपाला आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले. नाले दुथडी भरून वाहिले. काढणी केलेला कोबी, फ्लॉवर, टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. बांबू आणि तारा तुटल्याने या बागा भुईसपाट झाल्या. उन्हात ठेवलेला कांदा भिजला. आंबा, द्राक्षबागांचे नुकसान झाले. चांदवड तालुक्यात थोडंबे, कानमंडाळे, कुडांणे येथे घरांचे, शेडनेट, पोल्ट्री फार्म यांचे नुकसान झाले.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ