सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 July
Follow
राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना ५ वर्षे मोफत वीज; ७.५ एचपीपर्यंत कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी ७.५ एचपी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. राज्यात असे कृषीपंप वापरणारे ४४ लाख ३ हजार शेतकरी असल्याचे जीआरमध्ये म्हटले आहे. म्हणजेच या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. या शेतकऱ्यांना पुढच्या ५ वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे. या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल २०२४ पासून होणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्याचे बिल भरावे लागणार नाही.
54 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ