पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Feb
Follow

राज्यातील जमीन सेंद्रिय लागवडीखाली आणण्याचे धोरण

अंबाजोगाई: ‘‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील २५ लाख हेक्टर जमीन सेंद्रिय लागवडीखाली आणण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र पातळीवर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. प्रशिक्षणार्थीनी सर्व प्रकारचे सेंद्रिय शेती विषयक ज्ञान घेऊन अडचणी दूर करणे गरजेचे आहे,’’असे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक श्री. सुभाष साळवे म्हणाले, दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बीड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत गटप्रमुख व सदस्य शेतकरी यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ