पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 June
Follow

राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पावसाचा जोर

मॉन्सून उंबरठ्यावर आलेला असताना पूर्वमोसमी पावसाने मंगळवारी (ता. ४) राज्यात विविध ठिकाणी हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर राहिला. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. याशिवाय अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात पुन्हा वादळाचा तडाखा बसून केळी, पपईच्या बागांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, बुधवारी (ता. ५) देखील राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमधील धानोरा परिसरात तसेच बीड जिल्ह्यातील शिरूरकासार शहरात मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात नांदेड, लोहा, कंधार तालुक्यांत मध्यम पाऊस झाला.


62 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ