पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
26 Oct
Follow

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (Rajya Krushi Yantrikikaran Yojana)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ही राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी एक महत्वपूर्ण योजना आहे. कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे हे या योजनेचे महत्वाचे उद्देश्य आहे. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया या महत्वपूर्ण अशा योजनेविषयीची माहिती.

उद्देश्य (Purpose):

  • जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
  • प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारांमध्ये जागरुकता निर्माण करणे.

धोरण :

कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांद्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित देणे.

अनुदान :

या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:

  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  • बैल चलित यंत्र/अवजारे
  • मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  • प्रक्रिया संच
  • काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  • फलोत्पादन यंत्र/अवजारे
  • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  • स्वयं चलित यंत्रे

पात्रता (Eligibility):

  • राज्य सरकार द्वारे चालवली गेली कृषी यांत्रिकीकरण योजना असल्या कारणामुळे योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.
  • अर्जदार शेतकरी असावा त्याच्याकडे स्वतःच्या शेतीचा सात बारा व आठ अ असावा.
  • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लोक देखील अर्ज करू शकतात अर्जदाराने जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत जी काही अवजारे शेतकऱ्यांनी खरेदी केली आहेत ती किमान सहा वर्षे शेतकऱ्यांनी वापरणे गरजेचे आहे.
  • सहा वर्षानंतर ही अवजारे शेतकऱ्यांना दुसऱ्या कुणाला तरी हस्तांतरीत करता येतील किंवा विक्री करता येतील अथवा गहाण ठेवता येतील.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार अशा एकाच यंत्रासाठी अनुदान घेऊ शकतो.
  • अर्जदाराला ट्रॅक्टर सोबत चालणाऱ्या अवजारांसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्याकडे ट्रॅक्टरचे अनुदान घेतल्याचा पुरावा असावा.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी एखाद्या यंत्रासाठी अर्ज करून यंत्र खरेदी केल असेल, तर किमान दहा वर्षासाठी त्याला त्याच अवजारासाठी अर्ज करता येणार नाही परंतु या काळात शेतकऱ्याला दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे (Important Documents):

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • यंत्र खरेदी केली असल्याची पावती
  • परीक्षण केला असल्याचा अहवाल

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (Application Process):

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारे करता येईल.

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे (Offline Application Process):

  • अर्ज भरण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाणे गरजेचे आहे.
  • जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जाऊन आपल्याला कृषि यांत्रिकीकरण करण्याचा अर्ज द्यायचा आहे.
  • वाचून आपल्याला त्यावर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे हे वरती दिलेली सर्व कागदपत्रे यासोबत जोडायचे आहे.
  • आता हे जोडलेली कागदपत्रे आपल्याला संबंधित अधिकाराकडे जमा करायची आहेत व त्यांच्याकडून पावती घ्यायची आहे. ही पावती आपल्याला भविष्यात उपयोगी पडेल.

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online Application Process):

  • कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी http://mahadbtmahait.gov.in वेबसाईटवर क्लिक करा.
  • आता आपल्यासमोर पेज ओपन होईल आता आपल्याला कृषी विभाग वर जायचे आहे.
  • कृषी विभागातील कृषी यांत्रिकीकरण बटणावर क्लिक करा.
  • आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे.
  • सर्व कागदपत्रे या अर्जा सोबत अपलोड करायची आहेत.
  • आता आपल्याला सेव्ह आणि क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा अर्ज भरू शकतो.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ योजनेसाठी अर्ज कसा करावा?

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ साठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

2. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ साठी अर्ज करावयाचा असल्यास http://mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून करावा.

3. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२४ आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाली आहे.

47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ