पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Nov
Follow
'रब्बी' पेरणीला जिल्ह्यात वेग
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना अधिक आशा आहेत. सध्या काही भागात पेरण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत १ लाख १२ हजार ९४१ हेक्टर (२४.५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा ज्वारी, गहू आणि हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा प्रामुख्याने खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण रब्बी हा जिल्ह्याचा मुख्य हंगाम राहिला आहे. गेल्या काही वर्षात पावसाच्या असमान हजेरीमुळे या दोन्हीही हंगामात आता पिकांचे क्षेत्र होत आहे. यंदा खरिपात शेवटच्या टप्प्यात पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ