पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Dec
Follow

'रब्बी'साठी ९९ कोटी ८४ लाख रुपये पीककर्जाचे वाटप


यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात ता. १५ डिसेंबर अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यात १२ हजार ७५६ शेतकऱ्यांना ९९ कोटी ८४ लाख रुपये (१२.७७ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात विविध बँकांना मिळून एकूण ७८२ कोटी ३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात व्यापारी बँकांना (राष्ट्रयीकृत बँका) ४४४ कोटी ९ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १७२ कोटी ९२ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०७ कोटी १६ लाख रुपये, खासगी बँकांना ५७ कोटी ८६ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.

28 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ