पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Jan
Follow

रब्बीतील १ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी

जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२४) रब्बी हंगामात ३ लाख ४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅप (डीसीएस) द्वारे शुक्रवार (ता. ३) पर्यंत १ लाख ६३ हजार ५४५ हेक्टर क्षेत्राची पीक पाहणी करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात डीजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपव्दारे पीक पाहणीस रविवार (ता. १ डिसेंबर) पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण पीक पाहणी करावयाच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची संख्या ७ लाख ४५ हजार ८०५ आहे.


30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ