पोस्ट विवरण
सुने
कृषि
गोभी
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
24 Dec
Follow

फुलकोबी पिकामध्ये गड्ड्याचा आकार वाढविण्यासाठी उपाय (Remedies to increase tuber size in Cauliflower crop)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

महाराष्ट्रामध्ये कोबीवर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी ही भाजी अतिशय लोकप्रिय आहे. जवळ-जवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये फुलकोबीची लागवड केली जाते. हे थंड हवामानात येणारे पीक असून सुधारित तसेच संकरीत जातींच्या उपलब्धतेमुळे त्यांची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर एवढे क्षेत्र आहे. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे 7000 हेक्‍टर एवढे क्षेत्र आहे. याच फुलकोबीच्या पिकात अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचा आकार वाढत नाही, रंग हवा तसा येत नाही आणि वजन कमी राहते. म्हणूनच आजच्या आपल्या लेखात आपण फुलकोबीमध्ये गड्डाचा आकार वाढविण्यासाठी काय उपाय करायला हवेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

फुलकोबी लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान (Suitable Land and Climate for Cauliflower Cultivation):

  • फुलकोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
  • जमिनीचा सामू 5.5 ते 6.6 इतका असावा.
  • फुलकोबी पिकाला हिवाळी हवामान मानवते. ही थंड हवामानात होणारी भाजी आहे.
  • सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान फुलकोबीच्या वाढीस पोषक असते.
  • फूलकोबीच्‍या जाती तापमानाच्‍या बाबतीत अधिक संवेदनशील असल्‍यामुळे त्‍यांची निवड त्‍या-त्‍या हवामानाच्‍या गरजेनुसार करावी.
  • अति प्रमाणात दंव असल्यास ते फुलकोबी पिकाचे नुकसान करते.

फुलकोबी लागवडीची वेळ (Cauliflower Planting Time):

  • लवकर येणाऱ्या वाणांसाठी : सप्टेंबर-ऑक्टोबर
  • मध्यम येणाऱ्या वाणांसाठी : जून-जुलै-ऑगस्ट
  • उशिरा येणाऱ्या वाणांसाठी : एप्रिल- मे

फुलकोबी पिकात गड्डा सेटिंग झाल्यानंतर गड्ड्याची योग्य फुगवणी होण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक असते. फुलकोबी लहान आकाराचा, रंगाने फिकट अथवा कमी वजनाचा दिसत असल्यास खालील उपाययोजना कराव्यात.

फुलकोबीचा आकार आणि रंग वाढविण्यासाठी:

चेलेटेड कॅल्शियम 22% @200 ग्रॅम आणि बोरॉन 20% (देहात न्यूट्री - DOT) 200 ग्रॅम + ऑर्थो सिलिका ऍसिड (जियोलाइफ टॅबसिल) 200 ग्रॅम + देहात lokke 25 मिली ची पीक 50 ते 70 दिवसाचे असताना 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

फुलकोबीच्या गड्ड्याचे वजन वाढविण्यासाठी:

13:00:45 पोटॅशिअम नायट्रेट (देहात न्यूट्री-KNO3) 2 किलो + चेलेटेड मॅग्नेशिअम 200 ग्रॅम प्रति एकर + देहात lokke 25 मिली ची पीक 50 ते 70 दिवसाचे असताना 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

ही फवारणी गड्ड्यांची चांगली वाढ आणि फुगवणीसाठी मदत करते, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते आणि गड्ड्यांचा आकार आकर्षक होतो. याशिवाय, कॅल्शिअम नायट्रेट (देहात न्यूट्री-CaNO3) 5 किलो प्रमाणात ठिबक मधून एकदाच सोडल्याने गड्ड्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शिअमची पूर्तता होते, ज्यामुळे गड्डे मजबूत आणि टिकाऊ होतात.

अशाप्रकारे योग्य व्यवस्थापन केल्यास फुलकोबीचे गड्डे दर्जेदार होतात आणि उत्पादनात वाढ होते.

तुम्ही तुमच्या फुलकोबी पिकामध्ये गड्ड्याचा आकार वाढविण्यासाठी काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. फुलकोबी लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

फुलकोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य आहे.

2. फुलकोबी लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?

फुलकोबी पिकाला हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान फुलकोबीच्या वाढीस पोषक असते. 3. फुलकोबी लागवडीची जातीपरत्वे योग्य वेळ कोणती?

लवकर येणाऱ्या वाणांसाठी : सप्टेंबर-ऑक्टोबर

मध्यम येणाऱ्या वाणांसाठी : जून-जुलै-ऑगस्ट

उशिरा येणाऱ्या वाणांसाठी : एप्रिल-मे

42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ