रस्ते वाहतूक आंतरराज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना - 2024 (सुधारीत) (Road Transport Inter-State Agricultural Trade Subsidy Scheme - 2024 (Revised))
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भारत हा कृषी प्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. भाजीपाला व फळ उत्पादनामध्ये देखील महाराष्ट्र अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये भाजीपाला व फळे यांचे उत्पादन घेण्यात येते. महाराष्ट्रातील फळे व भाजीपाल्याचे उत्पादन पाहता बाहेरील परकीय निर्यातीबरोबर देशांअंतर्गत चालणारा व्यापार ही तितकाच महत्वाचा आहे. परंतु वाहतुकीदरम्यान लागणारा वेळ यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा विविध अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना - २०२४ (सुधारीत) ही योजना राबवली जाते. शेतमालास परराज्यात बाजारपेठ मिळवून देणे आणि थेट व्यापारास चालना देणे या उद्देशाने सदर योजनेची सुरुवात केली आहे. आजच्या आपल्या या भागात आपण याच योजनेविषयी जाणून घेणार आहोत.
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) संबधित शासनाचा निर्णय :
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) महाराष्ट्र राज्यात कृषी पणन मंडळामार्फत शेतमालाच्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी राबविण्यात येणार. त्या अनुषंगाने योजनेच्या तारखेपासून दि - ३१.३.२०२६ या कालावधीपर्यंत देशांतर्गत रस्ते वाहतूक भाड्यामध्ये अनुदान (Transport Subsidy) देण्यासाठी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजनेच्या अटी व शर्ती :
- रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजनेसाठी राज्यातील नोंदणीकृत शेतकरी, उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकाच्या सहकारी संस्था या योजनेस पात्र असतील .
- महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादकांच्या सहकारी सभासदांनी स्वत उत्पादित केलेला शेतमालच सबंधित राज्यात पाठविणे बंधनकारक असेल .
- सदर योजना फक्त महाराष्ट्रातून रस्ते वाहतुकीद्वारे परराज्यात शेतमाल वाहतूक करून प्रत्यक्ष विक्री करण्यात येणाऱ्या व्यवहारासाठी लागू राहील.
- योजनेंतर्गत कामकाज सुरु करण्यापूर्वी अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात कृषी पणन मंडळामार्फत पूर्व मान्यता घेणे आवश्यक असेल .
- सदर योजना फक्त नाशवंत पिकांसाठीच लागु राहील. उदा- भाजीपाला, टोमॅटो, आंबा, कांदा, केळी, डाळिंब, द्राक्षे, संत्रे , मोसंबी, आले इत्यादी .
- सदर योजनेत नमूद नसलेला नाशवंत शेतमाल जर परराज्यात विकायचा असेल तर लाभार्थी संस्था, कंपनीने तसा स्पष्ट उल्लेख करून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत पूर्व मान्यता घेणे आवश्यक असेल.
- सदर योजनेमध्ये रस्ते मार्गे प्रत्यक्ष वाहतूक होणाऱ्या शेतमालावर अनुदान देय राहील. इतर कोणत्याही अनुषंगिक खर्चाचा यात सहभाग नसेल.
- तसेच शेतमाल विक्री झाल्यानंतरच अनुदान देय असेल माल विक्रीपूर्वी मिळणार नाही.
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजने अंतर्गत प्रत्यक्ष वाहतूक केलेल्या अंतरानुसार देय अनुदान तपशील:
- ३५० ते ७५० कि.मी.पर्यंत अंतर असल्यास देय अनुदान वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा कमाल मर्यादा रु २०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.
- ७५१ ते १००० कि.मी. पर्यंत अंतर असल्यास देय अनुदान वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा कमाल मर्यादा रु ३०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.
- १००१ ते १५०० कि.मी.पर्यंत अंतर असल्यास देय अनुदान वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा कमाल मर्यादा रु ४०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.
- १५०१ ते २००० कि.मी. पर्यंत अंतर असल्यास देय अनुदान वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा कमाल मर्यादा रु ५०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.
- २००१ कि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी देय अनुदान वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा कमाल मर्यादा रु ६०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.
- सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय व त्रिपुरा या राज्यांसाठी वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा कमाल मर्यादा रु ७५,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजनेतील नियम :
- महाराष्ट्रातील सीमेलगतच्या जिल्ह्यातील शेतमाल नियमित जवळच्या जोडून असणाऱ्या पर राज्यात जातो. परंतु दूरच्या बाजारपेठेमध्ये शेतमाल पाठविणे आर्थिक अडचणीचे असल्याकारणे ३५० कि.मी. पेक्षा कमी अंतरावरील वाहतुकीस कोणतेही अनुदान लागू / देय नाही .
- सदर योजनेंतर्गत एक लाभार्थी शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीस एका आर्थिक वर्षात कमाल रु ३.०० लाख एवढे वाहतूक अनुदान देय असेल.
- सदर अनुदान केवळ महाराष्ट्रातून इतर राज्यात केलेल्या एकेरी वाहतुकीस लागू असेल.
- शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीने वाहतूक दारास देय असलेली वाहतूक भाड्याची रक्कम धनादेश/आरटीजीएस/online बँकिंग द्वारे अदा करणे बंधनकारक असेल .
- शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीकडून पाठविण्यात आलेल्या कृषिमालाच्या प्राप्त विक्री रक्कमेतून लागणारा खर्च जसे – शेतमालाची हाताळणी, विरळणी, वर्गीकरण, पाकिंग, हमाली, वाहतूक, व कंपनी व संस्थाचे सर्विस चार्जेस इत्यादी खर्च कपात करून उर्वरित रक्कम सबंधित उत्पादक सभासद खात्यावर वर्ग केल्यानंतर वाहतूक अनुदानासाठी अर्ज करू शकतील. तसेच कपात रक्कम व अनुषंगिक आर्थिक व्यवहार ही संबधित शेतकरी सभासद, कंपनी व संस्था यांची अंतर्गत बाब असेल. याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचा कोणताही संबंध नसेल .
- पाठवलेला माल गुणवत्ते अभावी किंवा इतर कारणाने विक्री रक्कम प्राप्त न झाल्यास त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जबाबदार असणार नाही आणि याप्रकरणी वाहतूक अनुदान देय असणार नाही .
- सदर योजनेंतर्गत परराज्यात पाठविण्यात आलेल्या वाहतूक खर्चाचे अनुदान मागणी प्रस्ताव शेतमाल विक्री नंतर ३० दिवसात आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय कार्यालयात सादर करावेत.
- योजनेंतर्गत पर राज्यात शेतमाल पाठवीत असताना १ कन्साईनमेंट मध्ये शेतकरी उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीच्या किमान ३ उत्पादक शेतकरी सभासदांचा शेतमाल एकत्रित पाठविणे आवश्यक राहील.
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना - २०२४ (सुधारीत) लागणारी कागदपत्रे -
प्रपत्र १ - पूर्व मान्यता प्रस्ताव - विहित नमुन्यात अर्ज करावा.
- शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या नोंदणी पत्राची सत्यप्रत
- शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्यासभासदत्वाचा दाखला यादी .
- पिक पेरा नोंदीसह सभासदांचा सातबारा उतारा .
- शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेच्या पासबुक ची झेरॉक्स प्रत
प्रपत्र २ - अनुदान मागणी अर्ज - विहित नमुन्यात अर्ज करावा
- पुर्व मान्यतेच्या पत्राची प्रत
- ट्रान्सपोर्ट कंपनीचे मूळ बिल
- ट्रान्सपोर्ट कंपनीची (बिल्टी / एल आर नंबर सह पावती )
- शेतमाल विक्रीपश्चात खरेदीदाराकडून देण्यात आलेली पट्टी.
- सभासदाच्या बँक खात्यात रक्कम वर्ग झालेली बँक खात्याचा तपशील.
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत)योजनेत समाविष्ट जिल्हे व संबधित कार्यालय:
- नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या योजनेत समाविष्ट जिल्ह्यांसाठी संबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता : उप सरव्यवस्थापक,
- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पंचवटी, मार्केट यार्ड, दिंडोरी नका, नाशिक - ४२२००३, फोन नं- (०२५३)-२५१२१७६, ई-मेल - divnsk@msamb.com,
- नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या योजनेत समाविष्ट जिल्ह्यांसाठी संबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता : उप सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, नवीन कॉटन मार्केट यार्ड, एस टी स्ट समोर, गणेशपेठ, नागपूर - ४४००१८, फोन नं- (०७१२)-२७२२९९७, ई-मेल - divnag@msamb.com,
- लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड या योजनेत समाविष्ट जिल्ह्यांसाठी संबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता : उप सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, आंबा, डाळिंब सुविधा केंद्र, प्लॉट नं डी -१/ १ एम.आय.डी.सी वखार मंडळाचे गोदाम स्मोर बार्शी रोड लातूर - ४१३५३१, फोन नं- (०२३८२)-२१२०६१, ई-मेल - divltr@msamb.com,
- अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा या योजनेत समाविष्ट जिल्ह्यांसाठी संबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता : उप सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, नवीन कॉटन मार्केट यार्ड, अमरावती - ४४४६०१, फोन नं - (०७२१)-२५७३५३७, ई-मेल - divawati@msamb.com,
- रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या योजनेत समाविष्ट जिल्ह्यांसाठी संबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता : उप सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, आंबा निर्यात सुविधा केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी, नाचणेरोड, शांतीनगर, रत्नागिरी - ४१५६३९, फोन नं - (०२३५२)-२९९३२८, ई-मेल - divartn@msamb.com,
- औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना या योजनेत समाविष्ट जिल्ह्यांसाठी संबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता : उप सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, प्लॉट नं .५/८ पिसादेवी रोड, नवामोंढा, वखार महामंडळ गोदामाजवळ, जाधववाडी, औरंगाबाद - ४३१००७, फोन नं - ८४४६६८३९५६६, ई-मेल - divabad@msamb.com,
- पुणे, सोलापूर या योजनेत समाविष्ट जिल्ह्यांसाठी संबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता : उप सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, द्वारा-महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ कार्यालय, मार्केट यार्ड पुणे - ४११०३७, फोन नं - (०२०)२४२६१२५१, ई-मेल - divpun@msamb.com,
- सातारा, सांगली, सोलापूर या योजनेत समाविष्ट जिल्ह्यांसाठी संबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता : उप सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, बाजार समिती मल्टीपर्पज हॉल इमारत, कोल्हापूर - ४१६००५, फोन नं - (०२३१)२६५०१६६, ई-मेल - divkol@msamb.com.
तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना - २०२४ (सुधारीत) सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कोण करू शकतात?
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना - २०२४ (सुधारीत) योजनेंतर्गत राज्यातील नोंदणीकृत शेतकरी, उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकाच्या सहकारी संस्था या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि लाभ मिळवू शकतात .
2. रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना - २०२४ (सुधारीत) साठी अर्ज कोठे करावा?
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना - २०२४ (सुधारीत) साठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे अर्ज करावा तसेच त्या त्या जिल्ह्यासाठी सबंधित विभागाचे नाव आणि फोन नं आणि पत्ता दिला आहे तिथे संपर्क करावा.
3. रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना - २०२४ (सुधारीत) साठी वाहतूक अनुदान देय किती असेल?
सदर योजनेंतर्गत एक लाभार्थी शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीस एका आर्थिक वर्षात कमाल रु ३.०० लाख एवढे वाहतूक अनुदान देय असेल.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ