अंजीर पिकातील तांबेरा रोग - कारणे, लक्षणे आणि उपाय (Rust Disease in Fig (Anjeer) Crop - Causes, Symptoms and Management)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
सध्या महाराष्ट्रात एकूण 417 हेक्टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्यापेकी 312 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात आहे. सातारा व पुणे जिल्हयाच्या शिवेवरील नीरा नदीच्या खोऱ्यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर - सासवड तालुका) 10-12 गावांचा परिसर हाच महाराष्ट्रातील अंजीर उत्पादनाचा प्रमुख भाग आहे. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्ण खानदेश जिल्हयात या फळझाडाची थोडीफार लागवड केली जाते. व्यापारी दृष्टीने अंजीराची लागवड फक्त महाराष्ट्रातच केली जाते. अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड आहे. अलिकडे सोलापूर-उस्मानाबाद येथे अंजीराची लागवड शेतकरी करू लागले आहेत. त्यावरुन अंजीर हे सर्व दुष्काळी भागात उत्तम होईल असे म्हणायला हरकत नाही. अंजीर हे पोषणदृष्टया एक उत्तम फळ आहे. तसेच ते औषधी देखील आहे. मात्र अंजीर पिकावर येणाऱ्या तांबेरा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अंजीर उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट येऊ शकते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण अंजीर पिकातील तांबेरा रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.
अंजीर पिकातील तांबेरा रोगाची कारणे आणि लक्षणे (Causes and symptoms of Rust disease in fig crop):
- बागेतील रोगग्रस्त पाने, फांद्या यांच्यामार्फत रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव होण्यास मदत होते.
- रोगाचे बीजाणू (युरेडोस्पोर) हवेमार्फत रोगाचा दुय्यम प्रसार करतात.
- सुरुवातीला पानाच्या खालील बाजूस तपकिरी रंगाचे लहान, किंचित लांबट उंचवटे किंवा पुटकुळ्या सदृश्य असंख्य फोड दिसतात.
- या फोडांमधूनच पिवळसर, तपकिरी रंगाची बुरशीची भुकटी म्हणजेच बुरशीचे बीजाणू बाहेर पडतात.
- हे बीजाणू हवेमार्फत कित्येक किलोमीटरपर्यंत दूरवर पसरू शकतात. त्यातून रोगाचा प्रसार वाढतो.
- झाडाच्या मुळाशी, खोडाजवळ पाणी साठू दिल्यास रोगाचे प्रमाण जास्त राहते.
- अधिक प्रादुर्भावामध्ये झाडाची पाने पिवळी पडून गळतात.
- तीव्र प्रादुर्भावात फळे आणि फांद्या शिल्लक राहून पूर्ण पानगळ होते.
- अशा पानगळ झालेल्या बागेत फळांची योग्य वाढ होत नाही.
- रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या फळांवर लहान काळपट असे असंख्य डाग पडतात, अशी फळे चांगली पिकत नाहीत, कडक होतात किंवा पिकल्यानंतर ताबडतोब खराब होतात.
- बऱ्याच वेळा तांबेराग्रस्त पानावर अल्टरनेरिया रोगसुद्धा येतो. पाने डागाळलेली दिसतात.
- पावसाळ्यापेक्षा थंडीच्या दिवसांत हा रोग मोठ्या प्रमाणावर आढळतो.
अंजीर पिकातील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन (Management of Rust disease in fig crop):
- सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
- दरवर्षी बहर धरण्यापूर्वी बागेची हलकी छाटणी करावी. यामुळे रोगग्रस्त फांद्यांची संख्या कमी होते. नवीन फूट जोमाने येते.
- नव्या फुटीवर रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असतो.
- छाटणी केल्यानंतर सर्वप्रथम झाडाखाली व आजूबाजूला पडलेली सर्व रोगग्रस्त पाने व फांद्या गोळा करून बागेबाहेर नेऊन नष्ट कराव्या.
- बागेत हवा चांगली खेळती राहील, याची दक्षता घ्यावी.
- बागेस गरजेनुसार पाणी द्यावे. फवारणी करावी.
- रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरियाची शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये.
- पेरणीसाठी तांबेरा प्रतिरोधक वाणांची निवड करावी.
- वेळेवर पेरणी करावी.
- पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
- तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
- प्रोपिनेब 70% WP (बायर-अँट्राकोल) 600 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- सायमोक्सॅनिल 8% + मॅन्कोझेड 64% WP (कोर्टेवा-कर्झेट) 600 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- हेक्साकोनाझोल 4% + झिनेब 68% WP (इंडोफिल-अवतार) 400-500 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात अझिटॉप) 300 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- अझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात सिमपेक्ट) 200 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- टेबुकोनाझोल 50%+ ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन 25% w/w डब्ल्यू जी (Bayer-Nativo) 140 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे.
- अंजीर काढणी आधी एक महिना फवारणी बंद करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या अंजीर पिकातील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. अंजीर पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
अंजीर पिकाच्या वाढीस उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते.
2. अंजीर लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
अगदी हलक्या माळरानापासून मध्यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्य आहे. भरपूर चुनखडी असलेल्या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्तम आहे.
3. अंजीर पिकावर कोणते रोग आढळून येतात?
अंजीर पिकावर प्रामुख्याने तांबेरा व भुरी रोग आढळून येतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
