सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Dec
Follow
सांगली जिल्ह्यात ९१ टक्के रब्बीचा पेरा

सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी आटोपली असून एक लाख ७४ हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात गळीत धान्य पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर आहे. त्यापैकी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ लाख २५ हजार ६६ हेक्टर असून १ लाख १८ हजार ५२२ हेक्टरवर म्हणजे ९४ टक्के पेरणी झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात ज्वारी पीक पोटरी अवस्थेत आहे. तर इतर भागात पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
 
  
 
63 Likes
 Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
