पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Nov
Follow

सांगलीत ६ लाख ५७ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जनावरांच्यात आढळणाऱ्या तोंडखुरी पायखुरी (एफ.एम.डी.) आजारावरील प्रतिबंधक उपाय म्हणून केले जाणारे लसीकरण सांगली जिल्ह्यात ६ लाख ५७ हजार ६१० (८२ टक्के) जनावरांना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीस जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. प्रत्येकाच्या घरी दोनच्या पटीत दुधाळ जनावरांची संख्या आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील गावांत या आजाराने थैमान घातले होते. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. हा संसर्गजन्य आजार आहे. जनावरांच्या लाळेतून याचा प्रसार होतो.


67 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ