सांगलीतील अडीच हजारहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला फळ पीकविमा

पुनर्रचित हवामान फळ पीकविमा योजनेत २०२४-२५ मृग बहरासाठी जिल्ह्यातील २ हजार ७४७ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेतला आहे. वास्तविक पाहता, नैसर्गिक आपत्तीच्या संकटाने नुकसान होऊनही विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी यासाठी फळ पीकवि योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेत अर्ज करावा लागतो. नुकसान झाले तर, त्याचे पंचनामे होऊन भरपाई मिळते. जिल्ह्यात मृग बहरातील पुनर्रचित हवामान फळ पीकविमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी कृषी विभागाने प्रचार आणि प्रसिद्धी केली. जिल्ह्यातील २ हजार ७४७ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेऊन १ हजार ६४६ हेक्टरवरील फळ पिकांना संरक्षण दिले आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
