पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Aug
Follow
साखर कारखाना बुडाला, कामगारांवर उपासमारीची वेळ, थकीत पगारासाठी भीक मांगो आंदोलन
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 'एका ट्रस्टकडून ३०० कोटी आणून कारखान्याला ऊर्जितावस्थेकडे नेण्याचे स्वप्न दाखविणारे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यावर आता शेतकरी व कामगारांचा विश्वास राहिलेला नाही. पगार थकीत ठेवून त्यांनी विद्यमान कामगारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पाच ऑगस्टपर्यंत ठोस कार्यवाही झाली नाही तर त्यानंतर डॉ. शहापूरकर यांच्या कोल्हापुरातील घरासमोर भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी आज पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, बाहेरगावी असलेले तीन संचालक वगळता सर्व संचालकांच्या दारात जाऊन कामगारांनी थकीत पगारासाठी साकडे घातले. या मोहिमेनंतर कामगारांनी आज पत्रकार परिषद घेतली.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ