पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

साखर उत्पादन ३३३ लाख टन होण्याचा 'इस्मा'चा अंदाज

इंडियन शुगर मिल्स अॅण्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (इस्मा) यंदाच्या हंगामात (२०२४-२५) ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. 'इस्मा'ने मंगळवारी (ता. ३०) देशभरातील साखर उत्पादक राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीत उपग्रह प्रतिमेचे सर्वसमावेशक विश्लेषण, अपेक्षित उत्पादनावरील क्षेत्रावरील अहवाल, मागील आणि चालू वर्षातील पावसाचा प्रभाव, जलाशयांमध्ये पाण्याची उपलब्धता याची माहिती घेऊन हा अंदाज व्यक्त केला. गेल्या वर्षीपेक्षा तीन लाख हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले आहे. गेल्या वर्षी ५९.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती. यंदा त्यात घट होऊन ५६.०४ लाख हेक्टर इतके क्षेत्र तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. गेल्या वर्षी पाऊस न झाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये उसाची लागवड घटली आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ