पोस्ट विवरण
सुने
कृषि
कृषि ज्ञान
चंदन
बागायती पिके
DeHaat Channel
14 Oct
Follow

चंदनाची शेती (Sandalwood cultivation)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारतीय संस्कृतीत चंदनाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे मार्केट मध्ये चंदनाला जास्त मागणी आहे. भाजीपाला पिके असो किंवा नगदी पिके असोत, फळ पिके असोत मार्केटमधील चढ उतार, वाढत असलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी बांधव हुकमी आणि जास्त नफा यामुळे चंदन शेतीकडे वळू लागले आहेत. लागवड सुरू करण्यापूर्वी, आपण योग्य प्रकारे पिकाचे नियोजन केल्यास खर्च आणि नफ्याची गणना करून एक चांगला चंदन लागवडीचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि चांगला नफा कमवू शकतो. चला तर मग आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया चंदन लागवडीविषयी महत्वाची माहिती.

चंदन लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Temperature for Sandalwood Cultivation):

  • चंदनाची दमट वातावरणात चांगली वाढ होते, तर त्याच्या वाढीसाठी गरम वातावरणाची आवश्यकता असते.
  • चंदनाचे झाड अतिशय थंड असते.
  • झाडांच्या चांगल्या वाढीसाठी 12 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु तापमान 12 अंश से. पेक्षा कमी झाल्यास किंवा 35 अंश से पेक्षा जास्त झाल्यास झाडांची वाढ मंदावते.

चंदन लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Soil for Sandalwood Cultivation):

  • पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि वालुकामय चिकन मातीची सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली जमीन आवश्यक असते.
  • पिकाचा कालावधी मोठा असल्याने लागवड करण्यापूर्वी मातीचे परीक्षण करून घेतले पाहिजे.
  • जमिनीचा सामू (Soil pH) 6.5 ते 7.5 असणे आवश्यक आहे.

चंदनाच्या जाती:

  • लाल चंदन
  • श्वेत चंदन

लागवडीसाठी रोपे कशी तयार करावीत?

रोपे तयार करण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 वर्षे जुन्या झाडाची निवड करावी.

रोपे तयार करण्यासाठी बियांची लागवड रोपवाटिकेत केली जाते.

साधारणतः 7 - 8 महिन्यांची आणि 1 ते 1.25 फूट उंचीची रोपे लागवडीसाठी वापरली जातात.

चंदन लागवड पद्धत (Sandalwood Cultivation):

  • चंदन लागवडीसाठी संपूर्ण राज्यातील जमिन लागवड योग्य आहे. फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
  • चंदन हे परोपजिवी असल्यामूळे त्याला सोबत दूसरे झाड लावावेच लागते. मिलिया डूबिया, डाळिंब ई. चालतात.
  • साधारण 10×10 फुट  वर लागवड करावी लागते आणी मधल्या पाच फूटामध्ये मिलीया डुबिया लावावा लागतो.
  • एकरी 435 चंदन आणी 435 मिलीया डूबियाची रोपे लागतात.
  • सर्वप्रथम 1×1 फुट चा खड्डा करून, त्यात कंपोस्ट टाकून मग रोप लावावे. ही जंगली शेती असल्यामुळे नंतर फवारणी खताची गरज भासत नाही.
  • वर्षातून दोनदा निंबोळी खत द्यावे आणि सुरुवातीची तीन वर्ष ड्रिपने पाणी द्यावे.
  • चंदनाला सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे कारण चंदन सर्वच बाबतीत दुर्मिळ आहे. म्हणजे शंभर बिया पेरल्या तर त्यातल्या दहा ते पंधरा टक्के किंवा जास्तीत जास्त 20 टक्के बिया येतात.
  • एखाद्य किलो बियाण्यापासून दोनशे ते अडीचशे रोपं तयार होतात.
  • जून महिना लागवडीसाठी योग्य आहे.
  • पेरलेलं उगवायला जवळपास दोन महिने लागतात.
  • उगवल्यानंतर पंधरा दिवसानंतर पिशवीत ठेवलं जातं.
  • दोन वर्षे चंदनाच्या रोपट्याची वाढ पिशवीतच होते. पण दोन वर्षात पिशवी काही वेळा बदलली जाते.
  • पाच ते सहा वर्षात झाडाची उंची बारा ते पंधरा फूट एवढी अपेक्षीत आहे.
  • ज्या खड्ड्यात चंदन लावलेलं असतं तो खड्डा माती आणि शेणखतानं भरलेला असतो. विशेष म्हणजे चंदन सर्व प्रकारच्या मातीत उगवतं. तग धरतं.
  • चंदनाचं झाड हळूहळू वाढत. याचाच अर्थ चंदन जसे वयात येते तसे त्यात सुंगध भरतो.
  • सुंगध येतो म्हणजे त्याचं वजनही वाढतं.
  • चंदनाचं झाड जेवढा काळ ठेवाल त्यानुसार त्याचं वजन भरतं. दोन प्रकारची चंदनाची झाडं आहेत. एक लाल चंदन आणि दुसरं श्वेत चंदन.
  • आपल्याकडे श्वेत चंदनाचीच शेती केली जाते. कारण आपल्याकडची जमीन त्यासाठी अनुकूल आहे.

चंदन लागवडीसाठी योग्य आंतरमशागत:

  • लागवड केल्यानंतर प्रत्येक 6 महिन्यांनी होस्ट प्लांट ची उंची/वाढ ही पिकापेक्षा जास्त असेल तर छाटणी करावी.
  • दोन ओळींमध्ये जर तण दिसत असतील तर वेळोवेळी कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे.

चंदन पिकातील पाणी व्यवस्थापन (Water Management in Sandalwood cultivation):

  • चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी आठवड्यातून 1 ते 2 वेळा पाणी द्यावे.
  • दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून 2 वेळा पाणी ठिबकने द्यावे.
  • चौथ्या वर्षांपासून फक्त जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे.
  • पावसाळ्यात पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी द्यावे.

चंदन पिकातील किडी व रोग (Pest and Disease in Sandalwood):

  • चंदनाच्या रोपांची लागवड झाल्या नंतर मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो तर पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, शेंडे पोखरणारी अळी आणि साल खाणारी अळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

चंदन पिकाची काढणी आणि उत्पादन (Harvesting and Production of Sandalwood):

  • चंदनाची खोड निर्मिती 7 ते 10 वर्षांनंतर होते. लागवाडीच्या 10 वर्षांनी साधारणतः 1 किलो चंदनाचा गाभा मिळतो.
  • तर लागवडीच्या 20 वर्षांनी साधारणतः 4 किलोचा गाभा मिळतो.
  • चंदनाच्या गाभ्याचे लाकूड तयार होण्यास 20 ते 30 वर्षांचा कालावधी लागतो.
  • साधारणतः 20 वर्षानंतर प्रति झाड 4 किलो गाभ्याच्या उत्पादनापासून एकरी 350 झाडांपासून 1400 किलो गाभा मिळतो.

लागवड करताना आणि काढणी करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी:

  • लागवड केल्यानंतर तलाठी कार्यालयातुन साताबाऱ्यावर चंदन लागवडीची नोंद करून घ्यावी.
  • तसेच तोडताना वन विभागाची परवानगी घ्यावी.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार चंदन लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या चंदन पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. चंदन पिकाची लागवड कधी करावी?

चंदन पिकाची लागवड जून महिन्यात करावी.

2. चंदनाच्या जाती कोणत्या?

लाल चंदन, श्वेत चंदन या चंदनाच्या दोन जाती आहेत.

3. चंदन पिकात कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो?

चंदन पिकात चंदनाच्या रोपांची लागवड झाल्या नंतर मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ