पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 May
Follow

सौर कृषी वाहिनी अंतर्गत, कोल्हापूरच्या ६५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज

राज्य शासनाकडून कृषी सिंचनाला चालना मिळण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. यातील प्रभावीपणे चालवली जाणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 'अभियान २०२५' अंतर्गत जिल्ह्यात ४४ उपकेंद्रांच्या ठिकाणी ९६५ एकर जमिनीवर १७० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सौर प्रकल्प उभारणीसाठी नियुक्त एजन्सीला जमीन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सौर प्रकल्पासाठी निवडलेल्या उपकेंद्रांचे बळकटीकरणामध्ये रिले बसविणे, ब्रेकर्स बसविणे, आर्थिग करणे, बॅटरी व चार्जर व्यवस्था, खडीकरण, रंगरंगोटी आदी कामे प्रगतिपथावर आहेत.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ