सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Jan
Follow
सौरपंप योजनेत शेतकऱ्यांची कंपनीकडून लुबाडणूक

शासनाच्या योजनेतून सौरपंप मिळालेला असतानाही त्याचे साहित्य बसवण्यासाठी सबंधित कंपनीच्या लोकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप भारतीय जनसंसदच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत करण्याची मागणीही जनसंसदने केली आहे. भारतीय जनसंसदच्या पदाधिकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दोन वर्षांपूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या जाहिरातीनुसार पी. एम. कुसुम योजनेत ऑनलाइन सौर कृषी पंपासाठी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करतानाही जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.
30 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
