पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशुपालन ज्ञान
पशु ज्ञान
DeHaat Channel
4 Apr
Follow

शेळी पालनातून मिळावा फायदे (Sheli Palan Mahiti)

नमस्कार पशुपालकांनो,

शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. अश्मयुगाच्या  उत्तरधारेतील काळापासून मानवाने  शेळीपालन, संगोपन केले आहे. आपल्या भारतात शेळी पालन हे पूर्वीपासून चालत आलेले आहे. देशातील एकूण पशुधनामध्ये शेळ्यांचा ही मोठा वाटा आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्यवसाय कमी पैशात व कमी जागेत अगदी सहज करू शकतो. काही अहवालांनुसार असे समजते की, देशामध्ये 12 कोटींहून अधिक शेळ्यांचे पालन केले जाते. जर खूप कमी शेती असेल आणि कमी पैशात शेतीपूरक व्यवसाय सुरु करायचा असेल तर शेतकरी मित्रांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळणे फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत शेळी पालनातून मिळणाऱ्या फायद्यांविषयीची माहिती.

शेळी पालनाचे महत्व व फायदे :

  • शेळी पालन अतिशय उत्कृष्ट व्यवसाय असून आर्थिक दृष्ट्या फायद्याचा आहे.
  • शेळीपालनाचा व्यवसाय अत्यंत अल्प गुंतवणुकीत केला जाऊ शकतो. (गाय आणि म्हैस यांच्या तुलनेत)
  • साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात.
  • हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो.
  • काही जातीच्या शेळ्या या 14 महिन्यामध्ये दोनदा वितात यामुळे अधिक उत्पन्न मिळते.
  • शेळ्यांमध्ये दोन पिलांना जन्म देणाची क्षमता अधिक असल्याने त्या अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर ठरतात.
  • शेळ्या शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे बचत बँकेचे कार्य करत असतात. आवश्यकता भासल्यास काही शेळ्या त्वरित विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
  • शेळी हा प्राणी काटक असतो. त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवुन घ्यायची असते.
  • यांना खाण्यास निकृष्ट प्रतिचाही चारा चालतो. त्याचे रुपांतर त्या दूध व मांसात करतात.
  • त्यांचे वेत लवकर येतात म्हणून उत्पादन लवकर वाढते.
  • लहान चणीच्या असल्याने त्यांना निवाऱ्यास कमी जागा लागते.
  • त्यांच्या विष्ठेचे उत्तम खत होते.
  • बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे.
  • शेळीच्या प्रजातीपैकी पश्मिना ,अंगोरा, गड्डी  इत्यादी जातींच्या शेळ्यांच्या केसापासून लोकर मिळते त्यामुळे कपडे, शाली तयार करता येतात.
  • शेळीच्या हाडांचा उपयोग रासायनिक खते, दुथपेस्ट, खनिज इत्यादीसाठी केला जातो.
  • यांच्या शिंगांपासून व खुरापासून पदार्थ बनतात.
  • यांचे मांस चविष्ट असते.
  • शेळीपालनाचा आणखी एक फायदा म्हणजे घरातील कुठलीही व्यक्ती (मुले ,महिला, वृद्ध व्यक्ती) शेळीपालन सहज करू शकते.

शेळी पालनपद्धतीचे दोन प्रकार आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी:

  • बंदिस्त शेळीपालन:

या मध्ये शेळ्यांना गोठ्यात आणि शेड मधेच बंदिस्त ठेवून जागेवरच चारा आणि पाणी दिले जाते.

  • अर्धबंदिस्त शेळीपालन:

या मध्ये शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले जाते आणि नंतर गोठ्यात पुन्हा आणले जाते.

राज्यातील जाती :

  • महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, संगमनेरी, बोएर, कोकण कन्याळ शेळ्या आढळतात. उस्मानाबादी, संगमनेरी शेळ्या लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर भागात आढळतात.
  • संगमनेरी शेळीचा उगम अहमदनगर जिल्ह्य़ातील संगमनेर येथील आहे. ती दूध व मांसासाठी प्रसिद्ध आहे.
  • उस्मानाबादी शेळीचा उगम उस्मानाबाद येथील असून ती मांसासाठी प्रसिद्ध आहे. तिच्यामध्ये जुळी करडे देण्याचे प्रमाण 50 टक्केपर्यंत आहे.
  • कोकणातील उष्ण, दमट हवामान व जास्त पावसाच्या प्रदेशात तग धरण्याची क्षमता असलेली कोकण कन्याळ शेळी विकसित करण्यात आलेली आहे. तिच्या अंगावर काळा रंग व त्यावर पांढरे पट्टे असतात. ही शेळी अतिपावसातही तग धरू शकते. तिच्यामध्ये रोग व अन्य कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

आकारमानानुसार वर्गीकरण:

  • मोठ्या आकाराच्या शेळ्या : जमुनापारी, बिटाल, जखराना, झालवाडी, सिरोही इ.
  • मध्यम आकाराच्या शेळ्या : मारवाडी, कच्छी, सुरती, बारबरी, मेहसाणा, गोहीलवाडी, कन्नीअडू, मलबारी, संगमनेरी, उस्मानाबादी, गंजाम, चांगाथांगी, चेगू आणि गुड्डी इ.
  • लहान आकाराची शेळी : काळी बंगाली.

शेळ्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनानुसार शेळ्यांचे प्रकार :

दूध व मांस (दुहेरी उद्देश) : जखराना, जमुनापारी, बिटाल, झालवाडी, गोहीलवाडी, मेहसाणा, कच्छी, सिरोही, बारबरी, संगमनेरी, मारवाडी इ.

मांस उत्पादनासाठी : काळी बंगाली, उस्मानाबादी, गंजाम, मलबारी, कन्नीअडू इ.

मांस व लोकर उत्पादनासाठी : चांगाथांगी, चेगू, गुड्डी इ.राज्यांत संगमनेरी व उस्मानाबादी या जाती प्रचलित असल्या तरी खानदेशातील काठेवाडी, खानदेशी, कोकणातील कन्याळ, पाटण तालुक्‍यातील कुई या जाती दूध व मांसासाठी उत्तम असूनही त्यांचे गुणधर्म निश्‍चित झालेले नाहीत.

शेळ्यांची वैशिष्ट्ये :

  • या जाती कोणत्याही प्रकारच्या हवामानात तग धरू शकतात.
  • मुख्य पिकांपासून मिळणाऱ्या उपप्रकारच्या उत्पादनावर शेळ्या सहजगत्या तग धरू शकतात.
  • शेळ्या सेंद्रिय पद्धतीने पालनास उपयुक्त असून, सर्वसाधारण रोगांना सहजासहजी बळी पडत नाहीत.
  • शेळ्या दूरवर रानात, डोंगरकपाऱ्यांत चरण्यास जाऊ शकतात, तसेच कमीत कमी भांडवली गुंतवणुकीत व्यवस्थापन करणे सहज शक्‍य असते. कोणत्याही शेळ्यांमध्ये वातावरणाशी समरस होण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या निवाऱ्याची गरज नसते.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या जनावरांमधील दुग्ध ज्वर रोगावर वेळीच नियंत्रण मिळवू शकाल. तुमच्या जनावरांमध्ये दुग्धज्वराची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. शेळीपालन पद्धतीचे दोन प्रकार कोणते?

शेळीपालन पद्धतीचे बंदिस्त शेळीपालन आणि अर्धबंदिस्त शेळीपालन हे दोन प्रकार आहेत.

2. बंदिस्त शेळीपालन म्हणजे काय?

बंदिस्त शेळीपालना मध्ये शेळ्यांना गोठ्यात आणि शेड मधेच बंदिस्त ठेवून जागेवरच चारा आणि पाणी दिले जाते.

3. अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे काय?

अर्धबंदिस्त शेळीपालना मध्ये शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले जाते आणि नंतर गोठ्यात पुन्हा आणले जाते.

48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ