पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
21 Dec
Follow

शेळीपालनासाठी उत्तम जाती

शेळीपालनासाठी उत्तम जाती

नमस्कार पशुपालकांनो,

पशुधनपालन हा कृषी क्षेत्राचा एक विपुल भाग आहे. शेळी पालन हा आपल्या कृषिप्रधान देशात जोडधंदा केला जातो, जसे गाई म्हशींचे पालन, कुक्कुटपालन असे जोडधंदे केले जातात. गाई-म्हशींच्या व्यवसायाकरिता लागणारे भांडवल, त्यांचे संगोपन यासाठी होणारा प्रचंड खर्च, याच्या तुलनेत शेळीपालन हे कमी खर्चाचे आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण शेळीपालनासाठी उत्तम जातींविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

शेळ्यांची निवड करताना:

  • शेळीची वाढ वयाप्रमाणे झालेली असावी. शक्यतो 1 वीत झालेली शेळी विकत घ्यावी.
  • एका वर्षात शेळीचे वजन 30 कि. पेक्षा कमी असू नये.
  • शेळीची कांस मोठी व मऊ असावी. सड सारख्या लांबीचे व जाडीचे असावे.
  • छाती भरदार व पोट डेरेदार असावे.
  • शेळी नीटपणे माजावर येणारी व न उलटणारी असावी.
  • दोन वर्षात तीन व्हते देणारी असावी.
  • कळपातील पैदाशीचा बोकड दर दोन वर्षांनी बदलावा लागतो.

महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, संगमनेरी, सुरती आणि कोकण कल्याण या प्रमुख चार जाती आढळून येतात.

उस्मानाबादी शेळी:

शारिरीक गुणधर्म -

रंग : प्रामुख्याने काळा

कान : लोंबकळणारे

शिंगे : मागे वळलेली

कपाळ : बर्हिवक्र

उंची : 65 ते 70 सें.मी.

लांबी : 60 ते 65 सें.मी.

ऋतुचक्र (पुन्हा माजावर येण्याचा काळ) : 20 ते 21 दिवस

संगमनेरी शेळी:

शारिरीक गुणधर्म -

रंग: संगमनेरी शेळयामध्ये पांढरा (66%) पांढरट तांबडा आणि तांबडा (16%) रंग आढळतो.

नाक: तांबडे, काळा रंग आढळतो.

पाय: काळे, तांबडा रंग आढळतो.

शिंग: अंदाजे 8 ते 12% शेळया हया बिनशिंगी (भुंडया) आढळतात, उर्वरित शेळयांमध्ये शिंगे आढळतात. शिंगाचा आकार, सरळ, मागे वळलेली आढळतात.

कान: कान प्रामुख्याने लोंबकळणारे परंतु काही शेळ्यांमध्ये उभे किंवा समांतर आढळतात.

कपाळ: प्रामुख्याने बर्हिवक्र आणि सपाट.

दाढी: संगमनेरी शेळयांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते.

शेपटी: शेपटी बाकदार आणि सरासरी लांबी 18.46+0.25 सेमी आढळते.

स्तन :गोलाकार (42%), वाडग्यासारखे (25%), लोंबकळणारे (22%) आढळतात. स्तनाग्रे गोलाकार आणि टोकदार आढळतात.

दूध: 80 लिटर्स दूध उत्पादन 90 दिवसाच्या वेतामध्ये आढळते.

सुरती (खानदेशी/ निवानी)

शारिरीक गुणधर्म -

रंगः पांढरा

कानः लांबट आणि रुंद

कासः चांगली मोठी

दुध उत्पादन : दररोज एक ते दिड केलो आणि एका विताच्या हंगामात एकूण 120 ते 150 किलो

वास्तव्य : गुजरातमध्ये आणि धुळे ,जळगांव जिल्ह्यांमध्ये

कोकण कल्याण

कन्याल जातीच्या शेळ्या ह्या कोकणातील(मुंबई विभाग) समुद्ग किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, लिल्हा म्हणून ह्या प्रसिध्द आहे.

शारिरीक गुणधर्म -

रंगः वरच्या जबड्यावर पांढरा रंगचे पट्टे आढळतात.

पायः लांब, पायावर काळा पांढरा रंग आढळतो. पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात.

कातडीः कातडी मुलायम आणि गुळगुळीत असल्यामुळे शरीरावर पडणा-या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो. शरीरावर छोटे केस आढळतात.

डोक: नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे आढळून येतात.

कपाळः काळ्या रंगाचे, चपटे आणि रुंद असते.

कान: काळा रंग आणि पांढ-या रंगाच्या कडा, चपटे लांब आणि लोंबणारे असतात.

शिंगेः टोकदार, सरळ आणि मागे वळलेली आढळतात.

नाकः स्वच्छ आणि रुंद आढळतात.

ह्या शेळ्या नियमित आणि वर्षभर माजावर येतात.

तुम्ही वरील पैकी कोणत्या शेळ्यांचे पालन करता? त्यांच्याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही देखील शेळी पालनासाठी योग्य जात निवडू शकाल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


76 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ