पोस्ट विवरण
सुने
रोग
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
1 Feb
Follow

शेळ्यांमधील घटसर्प आजार

नमस्कार पशुपालकांनो,

पशूपालन हा शेती व्यवसायाचा मुख्य जोड व्यवसाय असला तरी त्याच पध्दतीने तो जोपासणे गरजेचे आहे. वातावरणातील बदल हे जनावरांवरदेखील पाहायला मिळतात. पावसाळ्याच्या तोंडावर घटसर्प या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून येतो. त्यालाच हेमोरॅजिक सेप्टिसिमिया नावाचा एक धोकादायक आजार असेही म्हणतात. यावर वेळीच उपाय झाला नाही तर जनावरे दगावण्याचाही धोका असतो. त्यामुळे वेळीच लसीकरण करुन घेणे हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. चला तर आजच्या लेखात जाणून घेऊया शेळ्यांमधील महत्वाच्या अशा घटसर्प या आजाराविषयीची माहिती.

शेळ्यांना आजार होण्याची कारणे:

  • शेळ्यांचा निवारा आणि चाऱ्याच्या अस्वच्छतेमुळे रोग लवकर पसरतात.
  • आहार संतुलित आणि पुरेसा नसेल तर शेळ्या, करडे अशक्त बनून रोगांना लवकर बळी पडतात.
  • पोटातील जंत व अंगावरील किटक वाढल्यास वजन आणि वाढ खुंटते.
  • एकूण संगोपनात दुर्लक्ष झाल्यास प्रजननक्षमता कमी होते, मरतुकही वाढते.
  • रोगाचे जंतू जमिनीत असतात व चारा, पाण्याद्वारे अन्ननलिकेत प्रवेश करतात.
  • जनावराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर अनुकूल परिस्थितीमध्ये अंतःत्वचेमधून रक्तामध्ये प्रवेश करतात.

असा होतो घटसर्प रोगाचा प्रादुर्भाव:

  • पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी हा आजार अधिक प्रमाणात आढळतो.
  • शिवाय अस्वच्छ ठिकाणी जनावरे बांधली किंवा लांबचा प्रवास किंवा अतिकाम करून थकलेल्या जनावरांवर या आजाराचे जीवाणू हल्ला करतात.
  • या रोगाचा प्रसार खूप वेगाने होतो.
  • आजारी जनावरांचे चारा, धान्य आणि पाणी यांचे सेवन निरोगी जनावरांनी केले तर हा रोग होतो.
  • इतर जनावरे आजरी जनावरांच्या संपर्कात आली तर हा आजार होतोच.
  • तसेच मादी जनावरांच्या दुधाने या रोगाचा प्रसार होतो.

घटसर्पाची लक्षणे:

  • तीव्र ताप - तीव्र ताप सुमारे 105 ते 106 डिग्री फॅ.
  • नाकपुड्यांतून चिकट पातळ स्त्रव स्रवतो, श्वासोच्छ्रास वाढतो, घशावर वेदना देणारी सूज येते.
  • काही वेळा घसा, कपाळ व जिभेवर सूज येते व मृत्यूही होतो.
  • डोळे लाल आणि सुजलेले दिसतात.
  • पुढील पायांच्या दरम्यान सूज येते.
  • श्वास घेताना पुटपुटण्याचा आवाज.
  • श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून जनावरांचा मृत्यू.

घटसर्पवर असा करा इलाज:

  • या आजारावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा जनावरांचा घटसर्प रोगामुळे मृत्यूही होऊ शकतो.
  • घटसर्प रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ती उपाययोजना करावी.
  • दरवर्षी मान्सूनपूर्व गॅलिक आजाराची लस जवळच्या पशुवैद्य संस्थेकडून घेणे आवश्यक आहे.
  • साथीच्या रोगांविरुद्ध वेळापत्रकानुसार लसीकरण करून घ्यावे.
  • उत्तम रोगप्रतिकार शक्ती 6-9 दिवस लसीकरणापश्चात निर्माण होत असल्याने जनावरांचे स्थलांतर करण्याच्या १० दिवस अगोदर रोगप्रतिबंधक लस टोचणे हिताचे ठरते.
  • कळपातील सर्व शेळ्याची दररोज बारकाईने पाहणी करून आजारी शेळी आढळल्यास तात्काळ उपचार करावेत.
  • जनावरांमध्ये घटसर्प आजाराची लक्षणे दिसताच आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
  • आजरी शेळ्यांना नदी, तलाव इत्यादी ठिकाणी पाणी पिऊ देऊ नका.
  • आजरी शेळ्यांच्या आधी निरोगी जनावरांना चारा, धान्य, पाणी इत्यादी द्यावे.

तुमच्या शेळ्यांमध्ये घटसर्प रोगाची कोणती लक्षणे आढळून आली? तुम्ही काय उपाययोजना केल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ