सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Sep
Follow
शेती विकासासाठी डिजिटल युगाची पायाभरणी
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी एकूण १४ हजार २३५ कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनांमध्ये प्रामुख्याने डिजिटल कृषी, पीक विज्ञान, कृषी शिक्षण, दुग्ध उत्पादन, फलोत्पादन, कृषी विज्ञान केंद्र बळकटीकरण आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती व प्रसारणमंत्री आश्विनी वैष्णव यांनी निर्णयांची माहिती दिली.
30 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ