पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 July
Follow
शेतीला दिवसा विजेसाठी सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प
पश्चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी आणखी १०९१ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २७६ उपकेंद्रांसाठी एकूण १९९१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॉटच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० ची वेगाने अंमलबजावणी सुरू असून, पश्चिम महाराष्ट्रातील ७१० उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ