पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Jan
Follow

शेतकाऱ्यांनो शेतमाल सुरक्षित ठेवा, मराठवाड्यात दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता

परभणी : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात दोन दिवसांत किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व 11 जानेवारीला किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 12 ते 18 जानेवारीदरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 14 ते 20 जानेवारीदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.


33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ