पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 July
Follow
शेतकरी संघ भ्रष्टाचाराच्या विळख्यात, चाळीस लाखांचा माल परस्पर विकला २० लाखांना
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शेतकरी संघाचा आणखी एक कारभार चव्हाट्यावर आला आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी संघाच्या मिरची पूड प्रकरणावरून जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. संघाचे पाय खोलात असलेल्या संघाला उभारी देण्यास आलेल्या पदाधिकाऱ्यांनी संघाच्या अखत्यारित असलेल्या सात पेट्रोल पंपांवरील ग्रीस, ऑईलसह सुमारे ४० लाख रुपयांचे पेट्रोलियम पदार्थ २० लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणतीही निविदा, संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव नसतानाही एवढ्या कमी किमतीला हे पदार्थ विक्री झाल्याचे दिसत आहेत.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ