पोस्ट विवरण
शेतकऱ्यांच्या मुलांना मोठी संधी, 'गोकुळ' उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय
कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभारणार आहे. यासाठी, शुक्रवारी (ता. ३०) होणाऱ्या संघाच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याला सभासदांकडून मंजुरी घेतली जाणार आहे. या क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी ६० ते ८० जागा मिळू शकणार आहेत. देशात ५६ आणि महाराष्ट्रात ५ पशुवैद्यकीय कॉलेज असून, 'गोकुळ'चा सहावा प्रस्ताव असणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली. संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ दूध उत्पादकांसह इतरांनाही गोकुळने प्रस्तावित केलेल्या पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना जिल्ह्यातच याचे शिक्षण घेता येणार आहे. वार्षिक सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. याचे सभासदांकडून निश्चितपणे स्वागत केले जाईल.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ