पोस्ट विवरण
शिंगाड्याची शेती (Shingada Production)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
शिंगाडा या फळाला उपवासाच्या काळात विशेष मागणी असते. शिंगाड्याची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात तलाव, शेततळे, तसेच भातपिकासारख्या खाचरांमध्ये केली जाते. ज्या शेतकऱ्यांच्या नैसर्गिक शेततळ्यात पाणी असते किंवा अति पावसामुळे शेतात कायम पाणी साचून राहते. त्यांना या पिकाची लागवड करता येते. शिंगाड्याची वेल व पाने पाण्यावर तरंगतात. फळे त्रिकोणी आकाराची असतात. शिंगाडे कच्चे किंवा उकडून खातात. शिंगाडे पौष्टिक असतात यांना वाळवून पीठ करून लाडू बनवून खातात. शिंगाड्याच्या फळामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. फळाची जाडी दोन सेंटिमीटर इतकी असते. फळाचा गर मऊ असतो व चव किंचित गोड असते. शिंगाड्याचे कंद व फळांना उपवासामध्ये विशेष मागणी असल्याने, ते पाणथळ शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते. आज आपण याच विशेष फळाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
हवामान (Climate):
- शिंगाडा पिकास उगवणीकरिता 12-15 अंश सेल्सियस तापमान आवश्यक आहे.
- फुलांचा चांगला विकास होण्याकरिता 20 अंश सेल्सियस तापमान गरजेचे असते.
- वर्षभरातील ऋतूनुसार असलेल्या तापमानात हे पीक उत्तम वाढते.
जमीन (Soil):
- शिंगाडा ही जलचर वनस्पती असल्यामुळे लागवडीमध्ये मातीची भूमिका फार महत्त्वाची नसते, परंतु असे निदर्शनास आले आहे की, तलाव, बोळी मातीच्या मातीत, सुपीक, काणदार, सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असतील तर शिंगाडा उत्तम वाढतो.
- शिंगाड्याची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात तलाव, शेततळे, तसेच भात पिकासारख्या खाचरांमध्ये केली जाते.
- ज्या शेतकऱ्यांच्या नैसर्गिक शेततळ्यात पाणी असते किंवा अति पावसामुळे शेतात कायम पाणी साचून राहते. त्यांना या पिकाची लागवड करता येते.
पर्णपुष्प :
- शिंगाड्याचा वेल काढण्यास कारणीभूत असणार्या पर्णपुष्पामुळेच पानांची संख्या व वेलीचा विस्तार होतो.
- कीड व रोगांमुळे पर्णपुष्प नष्ट झाल्यास संपूर्ण वेल निकामी होतो.
शिंगाड्याच्या जाती :
या पिकाच्या वर्गीकृत जातींचा फारसा अभ्यास झालेला नाही. सध्या प्रचलित असलेल्या खालीलप्रमाणे तीन जातींची लागवड केली जाते.
- भगवा शिगांडा
- लालसर शिंगाडा
- हिरवा शिंगाडा
लागवड (Cultivation) :
व्यावसायिक पद्धतीने लागवड:
अभिवृद्धी:
- शिंगाड्याची व्यावसायिक पद्धतीने लागवड बियाण्याद्वारे केली जाते.
- पूर्ण पिकलेले शिंगाड्याचे फळ एका भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून त्यात उगवण्यासाठी ठेवावे.
- काही दिवसांनी त्याला कोंब फुटतात. कोंब फुटलेले शिंगाडे वेगळे करून रोपवाटिकेतील पाण्याच्या टाकीत सोडावेत.
- पावसाळ्याच्या सुरवातीस किंवा इतर वेळेस शेततळे किंवा तलावात पाणी उपलब्ध असल्यास लागवड करावी.
- लागवडीसाठी तलावात गुडघाभर पाणी पुरेसे होते.
- रोपांची या गुडघाभर पाण्यात १ × २ मीटर किंवा २ × ३ मीटर अंतरावर लागवड करावी.
- पूर्ण वाढ झालेल्या वेलांचाही बियाणे म्हणून वापर करता येतो.
नर्सरी पद्धतीने लागवड:
- शिंगाड्याची रोपे एप्रिल व मे महिन्यात नर्सरीत तयार केली जातात.
- शिंगाडा या पिकाची एप्रिल व मे महिन्यात नर्सरी तयार करून रोपे मुख्य क्षेत्रात लागवडीकरिता तयार करून ठेवली जातात.
- रोपांची लागवड योग्य होईपर्यंत तलावात पाणी साचवून ठेवण्यात येते.
- शिंगाडा पिकाचे बी पेरून नर्सरी तयार केली जाते.
- पूर्णपणे पक्व झालेला शिंगाडा ओलावा असलेल्या ठिकाणी उगवणीकरिता ठेवतात.
- अंकुर आलेले शिंगाडे निवडून नंतर नर्सरीमध्ये पेरतात.
- पावसाळा सुरू झाल्यानंतर ही रोपे नर्सरीमधून काढून मुख्य शेतात लागवड केली जाते.
- जर तलावाची माती फार सुपीक असेल तर रोपांची गुडघाभर पाण्यात १ × २ मीटर किंवा २ × ३ मीटर अंतरावर लागवड करावी.
एकरी बियाणे (Seed Rate) :
शिंगाड्याची लागवड बियाण्यांद्वारे व कलमाद्वांरे करतात. एकरी क्षेत्राकरिता १०,८00 बियाणे पुरेसे होते.
पाणी व्यवस्थापन :
- एप्रिल व मे महिन्यात तलावातील पाणी सुकल्यानंतर तलावातील क्षेत्राप्रमाणे नर्सरीची जोपासना केली जाते व पावसाचे पाणी तलावात साचल्यानंतर नर्सरीतील रोपांची लागवड केली जाते.
- शिंगाडा पिकाच्या नर्सरीच्या संपूर्ण वाढीच्या काळात मातीवर 10 ते 30 सेंमी पाण्याची पातळी असणे गरजेचे आहे.
- तलावात 75 ते 90 सें.मी.पर्यंत उंचीची पाण्याची पातळी असणे गरजेचे आहे.
- या उंचीपर्यंत पुरेशा प्रमाणात वेलींची वाढ होऊन त्या उत्पादनक्षम होतात.
आंतरमशागत:
- जर दुष्काळ व पाण्याची कमतरता असेल तर तलावात पाणी टाकण्याची सोय करावी.
- जर जमीन फार सुपीक असेल तर शाखीय वाढ जास्त होऊन उत्पादन कमी मिळते. अशावेळी वेलीची हलकी छाटणी करावी.
- तणांचा बंदोबस्त करावा.
पहिली काढणी :
शिंगाड्याच्या वेलीवर सतत फुले येत राहतात व आलेल्या फुलांची फळधारणा होऊन पक्व झालेल्या शिंगाड्याची दर 15 दिवसांनी काढणी केली जाते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून काढणीला सुरवात होते. पहिल्या काढणीत 2 ते 3 क्विंटलपर्यंत शिंगाडा उत्पादन मिळू शकते.
दुसरी ते सातवी काढणी :
- दर 15 दिवसांनी जानेवारी अखेरपर्यंत किमान सात वेळा शिंगाडा तोडणी केली जाते व दुसर्या काढणीनंतर प्रत्येक वेळी 5 ते 6 क्विंटल दरम्यान उत्पादन मिळते.
- काढणी केलेली शिंगाड्याची फळे थंड जागी साठवावीत.
- फळे सुकू नयेत याकरिता प्लॅस्टिक थैली किंवा कंटेनर वापरावेत.
- काही फळांची काढणी करताना किंवा फळे हाताळताना इजा झाल्यास ती सडतात तर ती निवडून वेगळी करावीत.
- साठवणुकीकरता काही ठिकाणी मोठे फ्रिजसुद्धा वापरले जातात.
बाजारात विक्री :
- प्रक्रिया झालेल्या शिंगाड्याची विक्री किमान 2 दिवसांत करणे आवश्यक असते, अन्यथा ते खराब होतात
कच्या शिंगाड्याची बाजारात विक्री :
शिंगाडे खराब होऊ नये म्हणून दूर अंतरावरील बाजारपेठेकरिता कच्चा शिंगाडा पाठविला जातो व त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून दिला जातो.
अशा प्रकारे योग्य रित्या, शिंगाड्याची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या शिंगाडा पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. शिंगाडा पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
शिंगाडा पिकास उगवणीकरिता 12-15 अंश सेल्सियस तापमान आवश्यक आहे तर फुलांचा चांगला विकास होण्याकरिता 20 अंश सेल्सियस तापमान गरजेचे असते.
2. शिंगाडा लागवड कुठे केली जाते?
शिंगाडा पिकाची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात तलाव, शेततळे, तसेच भात पिकासारख्या खाचरांमध्ये केली जाते.
3. शिंगाडा पिकातील पर्णपुष्प म्हणजे काय व पर्णपुष्प नाहीसा झाल्यास काय होते?
शिंगाड्याचा वेल काढण्यास कारणीभूत असणार्या पर्णपुष्पामुळेच पानांची संख्या व वेलीचा विस्तार होतो. कीड व रोगांमुळे पर्णपुष्प नष्ट झाल्यास संपूर्ण वेल निकामी होतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ