पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Jan
Follow

सोलापुरात ज्वारी प्रक्रियेचे 98 उद्योग मंजूर; सरकारचे दीड कोटी अनुदान

सोलापुरात ज्वारी प्रक्रियेचे 98 उद्योग मंजूर; सरकारचे दीड कोटी अनुदान

सोलापूर : राज्यात ज्वारी उत्पादनात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मिलेट ची घोषणा झाल्यानंतर ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल 4 कोटी 94 लाख रुपयांच्या बँक कर्जावर 98 प्रकल्प सुरू झाले आहेत. मात्र आता मिलेट' बारामतीला हलविल्याने नव्याने ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात रब्बी हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात ही ज्वारीची पेरणी केली जाते मात्र सोलापूर जिल्ह्यात ज्वारीची पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळेच सोलापूर शहरालगत शेळगी येथील ज्वारी कोरडवाहू संशोधन केंद्राच्या जागेवर मिलेट ट्रेनिंग सेंटर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या बजेटमध्ये मंजूर करण्यात आले होते.


59 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ