पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Dec
Follow

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक थांबेना; पुन्हा लिलाव बंद राहण्याची शक्यता

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक थांबेना; पुन्हा लिलाव बंद राहण्याची शक्यता

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कांद्याची मोठी आवक होत आहे. एक हजारांहून अधिक कांदा गाड्या येत असल्याने बाजार समितीतील नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले. मागील आठ दिवसांत बाजार समितीत जिकडे तिकडे कांदाच कांदा पाहायला मिळाला. पाच हजारांवरील दरही 2000 ते 2500 रुपयांपर्यंत खाली आला, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. नियोजन पूर्णपणे कोलमडले असतानाही कोणाचे लक्ष नव्हते. संचालकही लक्ष देत नव्हते. व्यापारीही काही करू शकले नाही. यावर तोडगा काढून नियोजन करण्याऐवजी एक दिवसाआठ लिलाव करण्याचा निर्णय घेतला, त्याचा उलट परिणाम झाला, कारण लिलाव बंद ठेवल्याने दोन दिवसाचा माल एका दिवसात आल्याने पुन्हा आहे तीच परिस्थिती उद्भवत होती.


56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ