पोस्ट विवरण
सुने
कृषि
ज्वार
कीट
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
12 June
Follow

ज्वारी पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन (Sorghum crop : Major pests and their management)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य आहे. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारी हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील 10 लाख हेक्टर क्षेत्रावरील दख्खन पठारात कोरड्या जमिनिवर घेतले जाणारे एक महत्वपूर्ण पीक आहे. या पिकावर होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण ज्वारी पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

कीटक व्यवस्थापन (Insect) :

अमेरिकन लष्करी अळी:

  • या अळीची एक पिढी 32 ते 46 दिवसात पूर्ण होते.
  • या किडीचा मादी पतंग 1000 ते 2000 च्या समूहाने अंडी घालतो.
  • अंड्यांमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पानांचा हिरवा पापुद्रा खातात, सदर पानांवर पांढऱ्या रंगाचे लांबट चट्टे आढळून येतात.
  • अळीच्या डोक्यावर उलट्या इंग्रजी Y आकाराचे चिन्ह दिसून येते तसेच शरीराच्या आठव्या बॉडी सेगमेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके, त्यात केसही आढळतात.
  • अळी अवस्था 14 ते 19 दिवस असते पूर्ण वाढ झालेली अळी 2 ते 8 से. मी. जमिनीत जाऊन मातीचे वेष्टन करून कोषावस्थेत जाते ही कोषावस्था 9 ते 12 दिवसांची असते. त्यानंतर कोशातून नर किंवा मादी पतंग बाहेर पडतात व जवळपास 4 - 6 दिवस जगतात.

उपाययोजना:

  • पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
  • किडीच्या सर्वेक्षणासाठी पिक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.
  • नर पतंग पकडण्यासाठी एकरी 6 कामगंध सापळे लावावेत.
  • 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी 5 मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • अथवा अझाडीरॅक्टीन 1,500 पीपीएम (BACF - लिमडो) 5 मि.ली. प्रति लीटर पाणी प्रमाणे फवारणी करावी व नोमुरीया रिले या जैविक औषधाची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • क्विनालफोस 25% ईसी (धानुका-धानुलक्स) 8 किलो/एकर फवारावे किंवा
  • डेल्टामेथ्रिन 100 ईसी (11% w/w) (बायर-Decis) 60 मिलि एकर फवारावे किंवा
  • फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) 400 ते 600 मिलि एकर फवारावे किंवा
  • स्पिनेटोरम 11.7 % एससी (Delegate - dow) 180 मिलि 200 लीटर पाण्यातून एकरी फवारावे किंवा
  • नोव्हॅल्युरॉन 5.25% + इंडोक्साकार्ब 4.5% w/w एससी (Adama - Plethora) 175 मिलि 150 ते 200 लीटर पाण्यातून द्यावे.

खोड माशी:

  • या किडीची प्रौढ माशी घरातील माशीप्रमाणेच परंतु थोडी लहान असते.
  • अधूनमधून पाऊस पडत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.
  • या किडीच्या प्रादुर्भावामुळे ज्वारीच्या धान्याचे 40 ते 50 टक्के आणि कडब्याचे 30 ते 35 टक्के नुकसान होते.
  • सुरुवातीला अळी पांढुरक्या रंगाची व नंतर पिवळसर असते तिला पाय नसतात.
  • या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस मध्यशिरेजवळ पांढरी, लांबट अशी एक एक अंडी घालते.
  • अंड्यातून निघालेली अळी खोडात शिरून आतील वाढणारा भाग खाते. त्यामुळे वाढणारा पोंगा मरतो त्याला पोंगेमर असे म्हणतात. असे पोंगे सहजपणे काढता येतात.
  • प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुटवे येतात व त्यावरही या किडीचा प्रादुर्भाव होतो.
  • पेरणी उशीरा केल्यास या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. अशा परिस्थितीत पिकाची फेरपेरणी करावी लागते.
  • पावसानंतरच्या सप्टेंबर-ऑक्टोबरमधील लागवडीखालील खोड माशीचा प्रादुर्भाव साधारणतः जास्त असतो.

उपाययोजना:

  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम + फिप्रोनिल 0.6% जीआर (देहात - स्लेमाईट अल्ट्रा) 4 किलोचा बेसल डोस द्यावा.
  • क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% एससी (देहात - Ataque) 60 मिलि प्रति एकर द्यावे. किंवा
  • एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात - illigo) 54 ते 88 ग्रॅम एकर द्यावे किंवा
  • थायमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात - Entokill) 50 ते 80 मिलि एकर द्यावे किंवा
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) @100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी  किंवा
  • जर खोडमाशीचा प्रादुर्भाव 10% पोंगेमरच्या वर गेला तर क्विनालफॉस 25% ईसी (सिजेंटा-एकालक्स) 400 मिलि 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी 7 ते 8 दिवसांनी फवारणी करावी.

खोडकिडा:

  • या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून राखाडी किंवा गवती रंगाचा असतो.
  • पूर्ण वाढ झालेल्या अळीच्या शरीरावर अनेक मळकट ठिपके असतात व अळीचे डोके तांबड्या रंगाचे असते.
  • या किडीची मादी पानाच्या मागच्या बाजूस पुंजक्यात अंडी घालते.
  • अंड्यातून निघालेल्या अळ्या प्रथम पानाचा पृष्ठभाग कुरतडतात व नंतर पानांवर एका सरळ रेषेत बारीक गोल छिद्रे पाडतात.
  • अळी खोडात शिरून आतील गाभा खाते.
  • वाढणाऱ्या शेंड्याला इजा होऊन विशिष्ट प्रकारची पोंगेमर होते.
  • किडीचा प्रादुर्भाव साधारण: पीक एक महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरेपर्यंत होऊ शकतो.
  • अळी ताटात शिरल्यानंतर आतील गाभा खाते, त्यामुळे ताट आणि कणीस वाळते.

उपाययोजना:

  • जमिनीची खोल नांगरट करावी
  • तूर, चवळी ही पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत.
  • 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • सीएसएच-16, सीएसएच-18, सीएसव्ही-10, सीएसव्ही-15, सीएसव्ही-17 या खोडकिडीला प्रतिकार करणाऱ्या वाणांची पेरणी करावी.
  • नत्राचा आणि स्फुरदाचा नियंत्रीत हप्ता दयावा.
  • किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.
  • शेतामध्ये एकरी ट्रायकोग्राम चीलोनीस या परोपजीवी किटकाचा 50,000 अंडीपुंज म्हणजेच 4 ट्रायको कार्डचा वापर करावा.
  • दाट लागवड करु नये व पाण्याचा योग्य निचरा करावा.
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम + फिप्रोनिल 0.6% जीआर (देहात - स्लेमाईट अल्ट्रा) 4 किलोचा बेसल डोस द्यावा.
  • किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच क्लोरैंट्रानिलिप्रोल 18.5% एससीची (देहात - Ataque) 60 मिली प्रति एकरी फवारणी करावी. किंवा
  • एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात - illigo) 54 ते 88 ग्रॅम एकर द्यावे किंवा
  • थायमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात - Entokill) 50 ते 80 मिलि एकर द्यावे किंवा
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) @100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी  किंवा
  • जर खोडमाशीचा प्रादुर्भाव 10% पोंगेमरच्या वर गेला तर क्विनालफॉस 25% ईसी (सिजेंटा-एकालक्स) 400 मिलि 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी 7 ते 8 दिवसांनी फवारणी करावी.

मावा:

  • मावा ही कीड पीक वाढीच्या अवस्थेत असतात दिसून येते.
  • या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील अन्नरस शोषण करतात तसेच आपल्या शरीरातून मधासारखा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते.
  • त्यामुळे अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाने आकसतात झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

उपाययोजना:

  • निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

मिजमाशी:

  • या किडीचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यावर असताना आढळून येतो.
  • मिजमाशी दिसायला डासासारखी असून पंख पारदर्शक असून पोट नारंगी रंगाचे असते.
  • अळी सूक्ष्म व पांढऱ्या रंगाची असते.
  • मादी माशी फुलोऱ्यात अंडी घालते.
  • अंड्यातून बाहेर पडलेली अळी बिजांडकोषावर उपजीविका करते. त्यामुळे कणसात दाणे भरत नाहीत.
  • परिणामी उत्पादनात जवळपास 60 टक्के घट येते.

उपाययोजना:

  • मिजमाशीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी मिजमाशी उपद्रवग्रस्त शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी शक्यतो एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणांची निवड करून साधारणपणे एकाच वेळी आठवड्याच्या आत पेरणी साधल्यास मिजमाशीपासून संरक्षण होत.
  • पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.
  • क्विनालफोस 25% ईसी (धानुका-धानुलक्स) 8 किलो/एकर या प्रमाणात कणसांवर धुरळावी.
  • आवश्यकतेनुसार दुसरी धुरळणी/फवारणी पहिल्या धुरळणी/फवारणी नंतर 5-10 दिवसांनी करावी.
  • मेलेथीऑन 5% (अग्रवाल बीज भंडार-Sythion) 25-30 मिली/एकर या प्रमाणात फवारणी करावी.

तुम्ही तुमच्या ज्वारीच्या पिकातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

  1. महाराष्ट्रात ज्वारीचे पीक कुठे घेतले जाते?

महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.

  1. ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील योग्य हंगाम कोणता?

ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते

  1. ज्वारी पिकातील अमेरिकन लष्करी अळी कशी ओळखायची?

अमेरिकन लष्करी अळीच्या डोक्यावर उलट्या इंग्रजी Y आकाराचे चिन्ह दिसून येते तसेच शरीराच्या आठव्या बॉडी सेगमेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके, त्यात केसही आढळतात.

58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ