पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 June
Follow

सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड

कोल्हापूर येथील कृषी विभागातर्फे अनुदानावर देण्यात येत असलेल्या सोयाबीन बियाणे घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी कार्यालयात झुंबड उडत आहे. खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र १२ हजार ५०० हेक्टरवर आहे. दरम्यान, या वर्षी मोफत बियाणे उपलब्ध झालेले नाहीत. परंतु ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर सोयाबीन वाटप सुरू झाले आहे. तालुक्यासाठी ४५० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाली आहेत. त्यात सर्वसाधारण गटासाठी २३४ क्विंटल, अनुसूचित जातीसाठी १३९.५० क्विंटल, अनुसूचित जमातीसाठी ७६.५० क्विंटल बियाण्यांचे वाटप होणार आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ