सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोयापेंड निर्यातीसाठी केंद्र सरकारला साकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयापेंड निर्यातीसाठी केंद्र सरकारला साकडे घातले आहे. सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान दिल्यास देशातून सोयापेंड निर्यात वाढेल. देशातून अतिरिक्त सोयापेंड बाहेर गेल्यास देशात सोयाबीनचे दर सुधारतील. अर्थात, आता सोयाबीनचे दर वाढले तरी बहुतांश शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. कारण आता ज्यांच्याकडे सोयाबीन शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. मात्र पुढच्या हंगामाचा विचार करता आता सोयाबीनचे भाव वाढून अतिरिक्त साठ्याची विल्हेवाट लागणे आवश्यक आहे.
53 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
