पोस्ट विवरण
सुने
रोग
सोयाबीन
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
28 May
Follow

सोयाबीन: प्रमुख रोग, लक्षणे, प्रतिबंध आणि नियंत्रण (Soybean: Major Diseases, Symptoms and Control)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

सोयाबीन हे जगातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. ते वनस्पतिजन्य प्रथिनांचा (प्रोटिन्स) व अनेक रासायनिक उत्पादनातील घटक द्रव्यांचा महत्त्वाचा स्रोत आहे. गळीत धान्यामध्ये सोयाबीन लागवड सर्वात जास्त असुन हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीन हे पीक महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे पिक असुन, सोयाबीनमधील रोगांच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक स्वरूपातच जर नियंत्रण केले तर पुढील फवारणीसाठीचा खर्च कमी होऊन पिकाचे नुकसान कमी होते. त्यामुळे आपल्याला महत्वाचे रोग व त्यांची लक्षणे माहित असल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करणे सोपे जाते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण सोयाबीन पिकामधील रोगांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

सोयाबीन पिकातील प्रमुख रोग:

पानांवरील ठिपके (Nematodes):

लक्षणे:

 • हा रोग सारकोस्पोरा तसेच अलटर्निया बुरशीच्या प्रजातीमुळे होतो.
 • झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात.
 • कालांतराने पानावरील ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.
 • आद्र हवामान या रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरते.

रोग व्यवस्थापन:

 • पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5%) मिश्र घटक 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
 • रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 ग्रॅम प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

तांबेरा रोग (Rust):

लक्षणे:

 • तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून, हा रोग पानांच्या खालच्या बाजूला सूक्ष्म ठिपक्यांच्या स्वरूपात दिसून येतो.
 • हे ठिपके हळूहळू जांभळट व थोड्या उंचावलेल्या फोडात बदलतात.
 • हे ठिपके गोल ते अंडाकृती आकाराचे असून विखुरलेले किंवा पुंजक्यांसारखे असतात.
 • तांबेरा रोगाची लक्षणे पर्णकोषावर आणि फुलांच्या फांदीवरही दिसतात.

रोग व्यवस्थापन:

 • रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरिया शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये.
 • पेरणीसाठी तांबेरा प्रतिरोधक वाणांची निवड करावी.
 • वेळेवर पेरणी करावी.
 • पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
 • तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे.

जिवाणूजन्य करपा (Bacterial Blight):

लक्षणे:

 • पान व शेंगांवर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसतात.
 • ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते.
 • ठिपक्यांचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळून पडतात.

रोग व्यवस्थापन:

 • पिकाची फेरपालट करावी.
 • रोगविरहित फळांचे बी वापरावे.
 • जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
 • पिकाची लागवड मंडप अथवा ताटी पद्धतीने करावी.
 • वेलीचा संपर्क जमिनीशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
 • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने, फळे काढून नष्ट करावी.
 • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलो किंवा
 • पेनफ्लुफेन 13.28% डब्ल्यू/डब्ल्यू + ट्राइफ्लॉक्सीस्ट्रोबिन 13.28% डब्ल्यू/डब्ल्यू एफएस (बायर - एवरगोल एक्सटेंड) 8-10 ग्रॅम/10 किग्रॅ बीज प्रक्रियेसाठी किंवा
 • कार्बॉक्सिन 37.5% + थिरम 37.5% डबल्यु एस (धानुका - विटावॅक्स सुपर) 3 ग्रॅम/किलो बीज प्रक्रियेसाठी वापरावे
 • रोगाची लक्षणे दिसताच किंवा लागवडीनंतर 45 दिवसांनी,
 • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • अँथ्रकनोज नियंत्रणासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 300 मिलीची 200 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.

सोयाबीन मोझॅक (Mosaic) :

 • मावा ही कीड या रोगाच्या विषाणूची वाहक आहे.
 • झाडाचा रस व बियाण्यातून रोगाचा प्रसार होतो.

लक्षणे:

 • झाडांची वाढ खुंटते.
 • पाने लहान, आखूड, जाडसर असतात व सुरकुततात.

पिवळा मोझॅक (Yellow Mosaic) :

 • पांढरी माशी ही या रोगाच्या विषाणूची वाहक आहे.

लक्षणे:

 • पाने, शिरा पिवळ्या पडतात.
 • पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो.
 • शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.

सोयाबीन मोझॅक व पिवळा मोझॅक रोगाचे नियंत्रण:

 • या रोगाच्या लक्षणांकरीता तसेच माव्यांच्या व पांढऱ्या माशीच्या उपस्थितीकरीता शेताचे नियमित निरीक्षण करा.
 • यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फेरपालट केल्यास विषाणूंना टाळण्यात मदत होईल.
 • आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.
 • मित्र किड्यांना नुकसान होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा वापर सीमित ठेवा.
 • मुंग्यांच्या संख्येचे चिकट पट्ट्या लाऊन नियंत्रण करा.
 • जमिनीवर प्लास्टिक अच्छादन वापरून माव्यांना पळवुन लावुन रोगामुळे होणारे नुकसान कमी करा.
 • प्रत्येक ओळीत पडदे बांधल्यास माव्यांचा प्रतिबंध होईल.
 • थायामेथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) ची 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रति एकर फवारणी करावी किंवा
 • फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली प्रति एकर किंवा
 • जिओलाइफ नो व्हायरस 400 मिली प्रति एकर किंवा
 • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात - डेमाफीप) 100 ग्रॅम प्रति एकर प्रमाणात 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करावी

एकात्मिक व्यवस्थापन :

 • सोयाबीन पेरणीपूर्वी शेताची उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
 • पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
 • प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर जास्तीत जास्त 8 दिवसांच्या आत पेरणी आटपावी.
 • पेरणीसाठी कीड प्रतिकारक्षम वाणाचा वापर करावा.
 • पेरणीपूर्वी बुरशीनाशकासोबत थायोमिथोक्साम 30% एफ.एस. 10 मि.लि. प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्या माशीच्याही नियंत्रणास मदत होते.
 • पेरणीनंतर 15 दिवसांनी पिवळे चिकट सापळे एकरी 10 या प्रमाणे साधारणपणे 8-10 मीटर अंतरावर लावावेत.
 • शिफारशीप्रमाणेच नत्र खताची मात्रा द्यावी. अतिरिक्त मात्रा दिल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढतो.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

 • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
 • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
 • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
 • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
 • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
 • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
 • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
 • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
 • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
 • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
 • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

 1. सोयाबीन पिकासाठी योग्य हंगाम कोणता?

सोयाबीन पिकासाठी रब्बी आणि खरीप हंगाम योग्य मानला जातो.

 1. सोयाबीन पिकात कोणते रोग आढळून येतात?

सोयाबीन पिकात पानांवरील ठिपके, तांबेरा रोग, जिवाणूजन्य करपा, सोयाबीन व पिवळा मोझॅक असे मुख्य रोग आढळून येतात.

 1. सोयाबीन पिकासाठी योग्य हवामान कोणते?

सोयाबीन हे पीक उष्णता व पाण्याच्या ताणास संवेदनशील असे पीक आहे. हे पीक 20 ते 35 सेल्शिअस उष्णतामान व 700 ते 1200 मि. मी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात उत्तम येते व सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकावर परीणाम होतो.

57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ